आयुष्यात पहिल्यांदा मधुभाऊ नवले अक्रमक.! विघातक वृत्तीच्या बोकांडी बसून कर्जाची वसुली केल्याने हे वाटोळे करायला निघाले.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
आज बुवासाहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहाकारी पतसंस्थेचा निकाल लागला. यात १६ पैकी १६ उमेदवार (एकूण 21) मधुभाऊ नवले यांच्या पॅनलचे निवडून आले आहेत. त्यामुळे, विरोधकांचा सुुपडासाफ झाला आहे. विशेष म्हणजे विरोधकांना पाचशे मतांचा आकडा देखील पार करता आला नाही. तर, निवडून आलेल्या उमेदवारांना २ हजार ३०० पेक्षा जास्त मतदान आहेत. या निवडणुकीत २ हजार ७५० मतदान झाले असून त्यापैकी २ हजार ६१८ मते वैध ठरले आहेत. जेव्हा सर्व पॅनल निवडून आला तेव्हा विजयी उमेदवारांनी आपला विजय देखील साजरा केला नाही. कारण, का? तर विरोधक म्हणजे अंगावर एखादे झुरळ चढावे आणि ते झटकून फेकावे इतके शुल्लक आणि अदखलपात्र होते. त्यामुळे, विजय साजरा करताना देखील लाज वाटावी अशी दयनिय आवस्था मधुभाऊ नवले यांनी विरोधकांची केली होती. विजयाच्या वेळी मनोगत व्यक्त करताना आयुष्यात कधी नव्हे इतके मधुभाऊ नवले आक्रमक झाले होते. सैल्या भिलास देखील मानुसकी होती. इतकी निर्दयी आणि दगडाच्या काळजाचे विरोधक आहेत. अशा तळतळीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. कारण, विरोधक हे तत्वाने नव्हे तर, द्वेषाने निवडणुकीत उतरले होते, विजयासाठी नव्हे तर वाटोळे करण्यासाठी, आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरल्याच्या भावना नवले यांनी व्यक्त केल्या.
मधुभाऊ नवले म्हणाले. की, बुवासाहेब नवले पतसंस्थेना विश्वासाचा दिवा तेवत ठेवला आहे. मात्र, त्यास फुकर मारण्याचे काम काही विदुषक मंडळी करीत आहेत. या लोकांना बदनामी करणे, चांगल्या गोष्टींचे वाईट करणे, आर्थिक नुकसान करणे, बँकांना अडचणीत आणणे यासाठीच काही लोकांचा जन्म झालेला असतो. लोकांचे वाईट करण्यासाठीच काही लोकांचा जन्म झाला आहे, त्यातच त्यांना आपला पुरुषार्थ वाटतो असे म्हणत नवले यांनी विरोधकांचा समाचार घेतला. विरोधात काम करणार्या काही व्यक्तींनी बँकेत येऊन काही गोष्टींचे चित्रीकरण केले. हा उपद्यव्याप कशासाठी? तर, केवळ बँकेचे आर्थिक नुकसान करण्यासाठी आणि तिचे वाटोळे कसे होईल यासाठी यांचे प्रयत्न चालु आहेत. मात्र, जोवर आम्ही तेथे बसलो आहोत तोवर कष्टकरी, शेतकरी मायबाप जनतेच्या एक रुपयाला देखील अडचणीत येऊ देणार नाही. वेळप्रसंगी त्यांचे कुकर्म बाहेर काढायची वेळ आली तरी मागेपुढे पाहणार नाही अशी तंबी नवले यांनी विरोधकांना दिली.
खरंतर दु:ख या गोष्टीचे आहे. की, ज्या बुवासाहेब नवले आणि मुरलीमास्तर नवले यांनी समाजात एकोपा निर्माण करण्याचे काम केले, सर्वांच्या पाठीशी उभे राहून दु:खात साथ दिली. त्यांच्या फोटोंचा गैरवापर विरोधकांनी केला. त्यांच्या बॅनरवर या महान व्यक्तींचे फोटो पाहून फार वाईट वाटत होते. अशा प्रकारचा खेद व्यक्त करुन विरोधकांची लायकी काढण्याचा प्रयत्न केला. हे सर्व विरोधक मधुकर नवले नावाच्या विरोधात आहे हे देखील फार दु:ख वाटते. असे नवले म्हणाले. कारण, नवलेवाडीच्या प्रत्येक दु:खात मी सामिल झालो. ज्यांनी अर्ज भरला होता त्यांच्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा आम्ही पोलीस ठाण्याचे उंबरे झिजविले, यांच्यासाठी काय काय केले नाही. पण, यांनी त्याची जाणिव ठेवली नाही. त्यामुळे, हे लोक विकृत आहेत. खरतर विकृती या शब्दाला देखील लाजवेल यापेक्षा अधिक विकृत शब्द यांना लागू होतो अशा शब्दात त्यांनी तळमळ व्यक्त केली.
मी प्रत्येकासाठी निस्वार्थपणे काम केले आहे, मदती केल्या आहेत. आता मात्र तसे होणार नाही. घरात जन्माला आलेले झुरळ मारावच लागतं, विघातक उंदिर घरात शिरला तर तो मारावाच लागतो. मात्र, दुर्दैवाने माझ्याच नवलेवाडी गावातून मला ठराविक व्यक्तींचा विरोध झाला. माझ्या गावासाठी मी कोठे कमी पडलो? तरी देखील द्वेषाने निवडणुक लावणे आणि माझ्या विरोधात डीडीआर ते उच्च न्यायालय असा विरोध करणे, हे कशासाठी? अक्षरश: निवडून येणार नाही हे माहित असताना देखील अर्ज भरणे आणि निवडणुका लढविणे हे कशासाठी? ज्यांनी उभ्या आयुष्याची कमाई पतसंस्थेत विश्वासाने ठेवली त्यांना तुम्ही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहात यापेक्षा दुसरे कोणते मोठे पाप नाही. परंतु ज्या विश्वासाने जनतेने ठेवी ठेवल्या आहेत. त्यास आम्ही बांधिल आहोत. कोणतीही विघातक वृत्ती येथे आम्ही येऊ देणार नाही, एव्हाना मतदारच त्यांना थारा देणार नाही, हे आज त्यांनी दाखवून दिले आहे.
मधुभाऊ पुढे म्हणाले. की, माझ्या चारित्र्यावर आजवर कोणी बोट ठेवले नाही. पण विघातक वृत्तींनी नको तशा अफवा पसरविल्या. खरंतर यांनी यांचे चारित्र्य तपासले पाहिजे. मी जर बोललो तर फार काही बोलु शकतो. अशा प्रवृत्तीना ठेचण्यासाठी त्यांच्या पोलीस ठाण्यातील काही जुण्या फाईली उघडण्याची वेळ आली तरी आम्ही मागेपुढे पाहणार नाही. आजवर आम्ही इतक्या खालच्या पातळीला गेलो नाही. तुम्ही मात्र वाईटातल्या वाईट पातळीला जातात आमच्यावर ती वेळ येऊ देऊ नका. पतसंस्था संभाळताना आम्ही कधी कोणाची जात, धर्म, पंथ, आडनाव, गाव पाहिले नाही. जो पात्र असेल त्याला कर्ज दिले आहे. तुम्हा सवार्र्ंच्या माहितीसाठी सांगतो. की, माझ्या रक्ताच्या नात्यातील लोकांना मी कायदेशीर कर्ज दिले आणि त्यांच्याकडून कायदेशीर मार्गाने बळजबरी का होईल ते वसुल केले. मग, यांना वेगळा न्याय का? व कशासाठी? यांना देखील कर्ज दिले आणि बोकांडी बसून कर्ज वसुल केले. त्यात गैर काय? मात्र, त्याचा रोष धरुन यांनी हा उहापोह मांडला आहे. मात्र, या कुकर्माला आम्ही जरा देखील घाबरत नाही. या सर्वांचे उत्तर आम्ही सर्व संचालक आमच्या चांगल्या कर्मतून देऊ असे मत नवले यांनी व्यक्त केले.
अशी आहेत विजयाची घोडदौड.!
गायकवाड अनिल जनार्दन (निशान विमान-२३८३), घोडे प्रतिभा भास्कर (निशान विमान-२३५७), चौधरी शिवाजी आनंदा (निशान विमान-२३९६), ताजणे देवराम महादु (निशान विमान-२३८२), देशमुख प्रकाश आण्णासाहेब (निशान विमान-२३६२), धुमाळ विठ्ठल ममताजी (निशान विमान-२३८०), धुमाळ शंकर सयाजी (निशान छत्री-३५२ पराभूत), नवले आनंदा निवृत्ती (२३५४), नवले कैलास पुंजाजी (निशान विमान-४१७), नवले मधुकर लक्ष्मण (निशान विमान-२३३७), नवले मनोहर नामदेव (३५६ पराभूत), नवले साईनाथ भाऊसाहेब (निशान विमान-२३४९), नवले सुजित गुलाब (निशान विमान-२३६७), नाईकवाडी सुर्यभान सुदाम (निशान विमान-२३६९), शेटे भागवत रावसाहेब (निशान विमान-२३७१), शेणकर मुरलीधर सिताराम (निशान विमान-२३२८), मंडलिक दिलीप उमाजी (निशान विमान-२२९३), मंडलिक विक्रम एकनाथ (निशान विमान-२२४१), असे १६ जण विजयी झाले आहेत.