भावाचं लग्न जमवताना त्याची बहिन पटवली, वाढदिवसा सोबत रात्र रंगली. पण, वारंवार अत्याचार केला तरी तो ब्लॅकमेलिंग करत होता, अखेर गुन्हा दाखल.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील मालदड रोड परिसरातील 34 वर्षीय महिलेची जवळच्या व्यक्तीसोबत मैत्री झाली. मंग काय.! हाय हॅलो सुरु झाले. मग त्या गुलूगुलू बाता..,फोन वरून तुम्ही खुप सुंदर दिसता. किती गोड बोलता असे बोलुन जवळीक वाढवली आणि पिडीत महिलेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संगमनेरातील एका हॉटलेमध्ये नेले. वाढदिवस साजरा केल्यानंतर तु मला फार आवडते असे म्हणुन रूममध्ये नेले व वाईट हेतूने अंगावरून हात फिरून पिडीत महिलेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला. ही घटना 4 सप्टेंबर 2020 ते 18 ऑगस्ट 2022 रोजी दरम्यान वेळोवेळी घडली. तर तिला ब्लॅकमेल करून बळजबरीने संभोग करण्यात आला. त्यामुळे, पिडीत महिलेने गुरुवार दि. 18 ऑगस्ट 2022 रोजी संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठले आणि आपली तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीसांनी कैलास बबन धाकतोडे (रा. फत्तेबाद, ता. राहता) याच्यावर गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकीता महाले करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरालगत मालदाड रोड परिसरात राहणारी पिडीत महिला संगमनेरातील एका नामांकीत कापड दुकानात काम करत होती. त्यांचे घरचे किराणा दुकान असल्याने घरच्या दुकानात वेळ देऊन कापड दुकानात काम करत असल्याने मोठ्या कसरतीत ती जिवण जगत होती. सण 2020 मध्ये पिडीत महिलेच्या भावाने प्रेम विवाह केला. त्यावेळेस आरोपी कैलास धाकतोडे याने लग्न करण्यासाठी मदत केली. त्यामुळे, पिडीत महिलेची व आरोपी कैलास धाकतोडे याच्याशी चांगला परिचय झाला होता. तेव्हा आरोपी कैलास धाकतोडे याने पिडीत महिलेचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर आरोपी धाकतोडे हा पिडीत महिलेला सारखे फोन करून बोलत होता.
फोनवर बोलताना पिडीत महिलेला म्हणायचा की, तुम्ही खुप सुंदर बोलता, मला तुम्ही आवडले आहात, असे आरोपी कैलास धाकतोडे हा वारंवार फोनवर पिडीत महिलेला बोलायचा. परंतु पिडीत महिला वेळोवेळी म्हणायचे की, माझे लग्न झाले आहे. मला दोन मुलं आहे. मला यात इंन्ट्रेस नाही. मात्र, आरोपी कैलास धाकतोडे हा पिडीत महिलेला कापड दुकानात येऊन भेटत होता. तो तेथे वारंवार येऊन पिडीत महिलेची व आरोपी कैलास धाकतोडे यांची हळूहळू जवळीकता वाढत गेली. त्यानंतर, पिडीत महिलेच्या घराबाहेर हॉटेलजवळ भेटणे वाढले होते. दि. 4 सप्टेंबर 2020 रोजी पिडीत महिलेचा वाढदिवस असल्याने आरोपी कैलास याने पिडीत महिला काम करत असलेल्या संगमनेरातील कापड दुकानावरून दुपारी 1 वाजता मोटार सायकलवरुन एका हॉटेलवर घेऊन गेला. तेथे पिडीत महिलेचा वाढदिवस साजरा केल्यानंतर आरोपी कैलास हा पिडीत महिलेला म्हणाला की, तु मला फार आवडते. अशी लगट करुन पिडीत महिलेला आरोपी कैलास रूममध्ये घेऊन गेला. आपण येथेच थांबु असे म्हणून अंगावर हात फिरवुन आरोपी कैलास याने पिडीत महिलेवर बळजबरीने अत्याचार केला.
दरम्यान, पिडीत महिलेला आरोपी कैलास याने ब्लॅकमेल करणे सुरू केले. तो पिडीत महिलेला म्हणाला की, हॉटेलवरील घडलेला प्रकार तु कोणाला सांगितला तर मी समाजात तुझी बदनामी करेल. असे म्हणुन आरोपी कैलास याने पिडीत महिलेला घराजवळ सोडले. त्यानंतर आरोपी कैलास याने वारंवार पिडीत महिलेला फोन केले. परंतु पिडीत महिलेने फोन उचलले नाही. मात्र, आरोपी कैलास हा पुन्हा कापड दुकानात येऊन बोला की, तु बाहेर भेट नाहीतर आपल्या मधील घडलेला प्रकार तुझ्या घरी सांगेन असे बोलुन पिडीत महिलेला धमकी देत असे. परंतु, पिडीत महिलेने भेटण्यास नकार दिला. त्यानंतर, पुन्हा आरोपी कैलास याने पिडीत महिलेला फोन केला व म्हणाला तु भेटायला आली नाही तर झालेला प्रकार तुझ्या पतीस सांगेल.
दरम्यान, असे बोलुन आरोपी कैलास याने पिडीत महिलेला हिवरगाव परिसरात दुचाकीवर आणले. तेथे पिडीत महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली व रस्त्यालगत असणाऱ्या शेतीमध्ये भर दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास शेतात नेऊन बळजबरीने बलात्कार केला. मात्र, पिडीत महिलेचा राग अनावर झाला. तिच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. पिडीत महिलेने आरोपी कैलास याला पाठीशी न घालता हा असाच चटावला तर याच्या आत्याचारास नेहमी बळी पडावे लागेल. त्यामुळे तिने थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले करत आहे.