ना.विखेंचा आ. थोरातांना पहिला दणका.! संगमनेरचे वादग्रस्तत पीआय देशमुख कंट्रोल जमा.! कार्यकर्त्यांमध्ये भगवा जल्लोष.!
- सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरात जनावरांच्या कत्तली खुल्लेआम झाल्या. त्याचे हृदयद्रावक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि हिंदुत्ववादी संघटनांसह संगमनेरकरांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले. त्यामुळे, आशा निष्पाप गोवंशाच्यारक्ताने माखलेल्या अधिकाऱ्याला संगमनेर शहरात ठेवायचे नाही त्यांचे निलंबन करा असा चंग हिंदुत्ववादी संघटनांसह संगमनेरकरांनी बांधला. यासाठी त्यांनी 36 तास प्रांत कार्यलयापुढे ठिय्या आंदोलन केले. पण, पोलिस अधिक्षकांकडुन हिंदुच्या विश्वासाची कत्तल झाली. अशी टिका त्यांच्यावर झाली. मात्र, हा लढा प्रशासकीय तथा कागदोपत्री पातळीवर सुरूच ठेवला आणि हिंदुत्ववादी सरकार येताच संगमनेर शहरातील पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांची उचलबांगडी करून नियंत्रण कक्षेत करण्यात आली. त्यामुळे, आता संगमनेरचे कामकाज पुन्हा वेगाने वाढेल अशी अपेक्षा असुन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना असमाधानकारक ठिकाणी नियुक्त केल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर नवे येणारे पोलीस निरीक्षक नवीन यंत्रणा उभी करून संगमनेरमधील क्राईमचा वाढता आलेख कमी करणार का? की, येरे माझ्या मागल्या अशीच भूमिका बजावणार.! याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, पीआयच्या कित्तेक चुकांना येथील लोकप्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांनी आजवर पाठीशी घातले होते. वारंवार कायदा व सुव्यवस्था बिघडली, पोलिसांनी मार खाल्ला, खुद्द पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यास कदारले. जातीय दंगली झाल्या. पोलीस ठाण्यात ट्रॅप झाले. साहेबांना नियंत्रण कक्षेत नेवून पुन्हा संगमनेरात आणले. म्हणजे असे काय गौडबंगाल होते. जे लोकप्रतिनिधी त्यांच्या पाठीशी इतके भक्कम उभे होते. आज, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेरकरांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. त्यामुळे, पीआय देशमुख यांच्या बदलीने अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर, स्थानिक कॉंग्रेसच्या नाकावर टिच्चून हा निर्णय झाल्याने या बदलीला राजकीय रंग चढल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, संगमनेर शहरातील पोलीस ठाण्याचा चार्ज पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घेतला तेव्हापासून ते वादग्रस्त राहिले असे त्यांचा भुतकाळ सांगतो. ते येऊन काही महिने झाले नाही तेच प्रभारी असलेल्या पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यावर लाचलुचपतची कारवाई झाली. त्यामुळे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना पोलीस अधीक्षक यांनी नियंत्रण कक्षेत जमा केले. त्यात अकोले पोलीस निरिक्षक अभय परमार देखील होते. मात्र, अवघ्या सात दिवसातच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना पुन्हा संगमनेर शहर पोलीस ठाणे मिळाले. तर, परमार यांच्यावर अन्याय झाला. त्यांना पोष्टींसाठी प्रचंड यातायात करावी लागली. का? तर, त्यांचे काम चांगले होते परंतु वरदहस्त नव्हता. मात्र देशमुख त्याना राजकीय वरदहस्त असल्याने संगमनेर शहर पोलीस ठाणे मिळाले असे बोले जात होते. त्यानंतर, दि. 6 मे 2021 रोजी संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथे पोलिसांवर दगडफेक झाली. यात दोन पोलिसांना दगड लागले. तरी देखील अपेक्षित कारवाई न झाल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनीच प्रभारी अधिकारी मुकुंद देशमुख यांच्यावर नाराजी दाखवल्याची चर्चा संगमनेरात रंगु लागली होती. एकीकडे मलिदा गोळा करणारे कर्मचारी यांच्या जवळ होते तर बाकी सर्व कर्मचाऱ्यांची त्यांच्यावर नाराजी होती. त्यामुळे, कधी नव्हे असे एक-दोन-तीन नव्हे कित्तेक गट या पोलीस ठाण्यात पडले होते. याचा परिणाम गुन्ह्यांची निर्गती कमी. पण, उणीधुनी आणि कुटाळे सोडून कोणतीही ठोस कारवाई येथे पहायला मिळाली नाही.
दरम्यान, दि. 2 ऑक्टोबर 2021 रोजी श्रीरामपूर पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांच्या पथकाने संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथे कत्तलखान्यांवर छापेमारी केली. यात 1 कोटी 50 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. तर त्याच ठिकाणी 31 हजार किलो मांसासह अक्षरशः रक्ताचा सडा पडल्याचे पहायला मिळाले होते. या प्रकरणात दोषी म्हणुन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी येथील संघटनांनी केली होती. यासाठी 36 तास संगमनेरकरांनी रस्त्यावर बसुन प्रांत कार्यलयापुढे आंदोलकंनी ठिय्या केला होता. तरी देखील याप्रकरणात त्यांना राजकीय अभय मिळाले. परंतु, या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना व काही सामाजिक कार्यकर्ते यांनी मुकुंद देशमुख यांच्याविरोधात थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र, त्यांची जागा ध्रुवताऱ्यासारखी अढळ राहिली. त्यानंतर देखील पोलीस ठाण्याच्या आवारात एक मोठा समुह एकत्र आला व पोलीस ठाण्यातील फर्निचर, कुंड्या, कर्मचाऱ्यांच्या गाड्या फोडुन गेला. तेव्हा, चक्क संगमनेर शहर आणि पोलीस ठाणे म्हणजे अक्षरश: बिहार वाटू लागले होते. पोलीस ठाणेच सुरक्षित नाही तर नागरिकांनी यांच्याकडून काय अपेक्षा ठेवावी.? याप्रकरणात चौकशी होऊन एसपी किंवा खुद्द लोकप्रतिनिधी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्याबाबत काहीतरी पाऊले उचलतील असे वाटले होते. मात्र, तसे काहीच झाले नाही.
दरम्यान, संगमनेर शहरातील गावचे दैवत बजरंग बलीच्या रथाला मनाचा झेंडा पोलीस निरीक्षक लावतात. पण, निष्पाप गोवंशाच्या रक्ताने माखलेल्या हाताने कोणतीही धार्मिक पुजा नको. म्हणुन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना हा मान मिळू दिला नाही. त्यामुळे, 92 वर्षे अखंड चालल्या परंपरेला खंड पडला. मात्र, गुन्हा केलाय तर शिक्षा झाली पाहिजे. आरोप झाला तर चौकशी झाली पाहिजे. म्हणुन पोलीस अधिक्षक यांनी गोमांस प्रकरणात पोलीस निरीक्षकांची चौकशी लावली. यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी संगमनेर शहरातील अनेकांचे जबाब घेतले. त्यामध्ये, गावातील पदाधिकर्यांनी व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने देखील विरोधात जबाब दिला होता. तरी देखील कारवाई शुन्य होती. एकीकडे, याच पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षकांवर शुल्लक कारणावरून तडकाफडकी बदली केली तर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यावर वारंवार आरोप होऊन देखील कुठली कारवाई होत नव्हती.
इतकेच काय.! त्यांच्यावर गोमांस प्रकरणात लाखोंचा मलिदा घेतात असा आरोप देखील झाला होता. तरी देखील कारवाई झाली नाही. मात्र, महाविकासआघाडी सरकार पडले आणि शिंदे सरकार येताच ना. विखे पाटील यांची संगमनेरातील हिंदुत्ववादी संघटनांसह अमोल खताळ, ऍड, श्रीराम गणपुले, जावेद जहागीरदार, सचिन कानकाटे, विशाल वाकचौरे, शुभम कपिले, यांनी भेट घेऊन पोलीस निरीक्षक देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी केली. आज पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी क्राईम मिटींग मध्ये पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यावर कारवाई करत नियंत्रण कक्षेत जमा केले. तात्पुरता चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे यांच्याकडे देण्यात आला.
निलंबन बाबत पाठपुरावा सुरूच
संगमनेर शहर पोलिस निरीक्षक देशमुख यांची मनमानी खूपच वाढली होती, त्यांच्या आशीर्वादाने गोवंश अवैध कत्तलखाने सर्रास सुरू होते तसेच इतर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू होते. पोलिसांची जनमानसातील प्रतिमा देशमुख यांच्यामुळे धुळीस मिळाली होती. पंचवटी हॉटेल येथील वास्तव, राजकीय नेत्यांच्या पाया पडणे, परस्पर सहकारी संस्थांचे वाहन वापर असे अनेक गंभीर तक्रारी त्यांच्या केल्या होत्या. गोवंश आज ही त्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्यामुळे नामदार विखे साहेबांकडे पाठपुरावा करून त्यांचे सध्या बदली व लवकरच निलंबन बाबत पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे
- अमोल खताळ पाटील