चक्क बाईने आपल्या जिवलग मैत्रीणीची खपाखप भोकसून हत्या केली. दोन लाख उसणे घेऊनही तिची नियात फिरली.!
शेजारी राहणार्या तरुणीला दोन लाख रुपये हात ऊसणे दिले असता ते मागितल्याचा राग येऊन आपल्या जिवलग मैत्रिणीनेच तिची धारधार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना २०१७ साली घडली होती. यातील महिला आरोपी अटक आहे. मात्र, तिचा साथिदार पाच वर्षापासून पसार होते. त्यानंतर आज मात्र त्याच्या मुसक्या आवळण्यात संगमनेर पोलिसांना यश आले आहे. यात आरोपी तकदिर उर्फ संदिप हरिसिंग तामचिकर (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) यास अटक करण्यात आली आहे. तर यात सुषमा चंद्रभान रोकडे असे मयत महिलेचे नाव आहे. कानुन के हाथ लंबे होते है.! असे म्हणतात, ही म्हण संगमनेर पोलिसांनी पुन्हा खरी करुन दाखविली आहे. पोलिसांनी पसार आरोपीस बेड्या ठोकल्या असून उद्या त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरालगत घुलेवाडी येथे काशिनाथ पवार यांचे कुटूंब वास्तव्यास आहे. त्यांची मुलगी सुषमा हिचे तिच्या सासरच्यांसोबत जमत नव्हते. त्यामुळे ती आपल्या आई वडिलांच्या घराजवळ राहत होती. या दरम्यान तिने एक सोबती म्हणून देशीबाई (नावात बदल आहे) नावाच्या मुलीसोबत मैत्री केली. यांच्यातील प्रेम इतके उतु जाऊ लागले की, एकमेकांच्या घरी जाणे, गप्पा गोष्टी करणे, एकत्र जेवण करणे, त्यामुळे सुषमा हिचा आपल्या मैत्रीणिवर फार विश्वास जडला होता. या सगळ्या परिस्थितीत सुषमाकडे दोन लाख रुपये आहेत असे तिला माहित होते. म्हणून फार प्रेमात येऊन तिने सुषमाला आपल्या आर्थिक फायद्यासाठी जाळ्यात ओढले आणि तिच्याकडे दोन लाख रूपयांची मागणी केली.
आता जवळची आणि जीवलग मैत्रीण आहे, त्यामुळे, ती आपला घात करील हे सुषमाच्या लक्षात देखील आले नाही. त्यामुळे, अगदी नि:स्वार्थपणे तिने दोन लाख रुपये देशीबाईला दिले. अगदी महिना पंधरा दिवसात पुन्हा परत करण्याच्या बोलीवर दिलेली रक्कम काही महिने उलटून गेले तरी देशीबाई द्यायला तयार नव्हती. त्यामुळे, एकदा सुषमा हिने तिला आपल्या कठोर भाषेत सुनावले होेते. त्याचा परिणाम असा झाला की, चोराच्या उलट्या बोंबा.! त्याप्रमाणे देशीबाईने तिच्याशी वैर पत्करले आणि या दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. काल प्रेमाची मैत्री आज दुष्मणीत बदलली होती. ती केवळ पैशाच्या गचाळ व्यावहारामुळे, त्यामुळे, दोघांचे झालेले टोकाचे वाद यांच्या घरच्यांनी मिटविले होते.
हा मनभेदाचा प्रकार तरी देखील पुढे कायम राहिला. दि. २ जानेवारी २०१७ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सुषमा ही देशीबाईकडे गेली होती. तिने विचार केला की, जर हीच राहिली नाही तर हिला दोन लाख रुपये द्यायची वेळ येणार नाही. त्यामुळे, या देशीबाईने सुषमा हिला ज्युस प्यायला दिला आणि त्यात काहीतरी विषारी द्रव टाकले. तेव्हा सुषमा ही आपल्या आई वडिलांच्या घरी आली होती तेव्हा ती अगदी तोतरी बोलत होती. तिच्यात काही बदल जाणवत होते. तेव्हा सुषमाच्या आईने तिला विचारले असता तेव्हा ती म्हणाली की, मला देशीबाईने ज्युस प्यायला दिले होते. तेव्हापासून मला असेच होत आहे. मात्र, थोड्यावेळाने मला बरे वाटेल असे म्हणुन त्यांनी दुर्लक्ष केले. सुषमा हिने तेथेच थोडेफार जेवण केले आणि ती आपल्या घरी जायला निघाली. तर वडिल म्हणले की, चल पोरी मी तुला घरी सोडवून येतो. दरम्यान, यावेळी तेथे देशीबाई आली आणि म्हणाली की, काका काळजी करु नका. मी सुषमाला तिच्या घरी सोडविते तेव्हा या दोघी तिच्या घराकडे निघाल्या.
त्या कालावधिनंतर ११:३० वाजण्याच्या सुमारास सुषमा यांचा मुलगा आजी आजोबांच्या घराकडे टाहो फोडत आला. तो प्रचंड घाबरलेला होता. त्यामुळे, त्याला फारसे काही सांगता येत नव्हते. मात्र, आई मेली असे म्हणत तो रडून-रडून सांगत होता. त्यानंतर हे लोक तत्काळ सुषमाच्या घरी गेले असता त्यांनी पाहिले तर ती पुर्णत: रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिच्या तोंडावर, गळ्यावर, पाठीवर, पोटावर धारधार शस्त्राने वार केलेले होते. हा धक्कादायक प्रसंग पाहून तेथे एकच आरडाओरड झाला होता. त्यानंतर अजुबाजुचे लोक तेथे जमले असता त्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा सर्व प्रकार कोणी केला याची शाहनिशा केली असता यात देशीबाई आणि संदिप तामचिकर या दोघांची नावे पुढे आली होती. त्यानंतर पोलिसांनी यातील देशिबाईला ताब्यात घेतले होते. मात्र, पाच वर्षे उलटून देखील संदीप पसार होता. आता मात्र, पोलिसांनी त्यास अटक केली आहे. अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांनी चार्ज घेतल्यानंतर जे गुन्हे कायम तपासावर आहेत त्यांची चौकशी करुन स्वत: भेट देऊन तपास सुरू केला आहे. यापुर्वी त्यांनी राजुर पोलीस ठाण्याचा गुन्हा आपण करण्यासाठी मार्गदर्शन केले तर आता घुलेवाडीच्या गुन्ह्यासाठी कंबर कसली होती. अर्थात पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांच्या पथकाने गेल्या काही दिवसात उत्तम कामगिरी केल्याने पोलिसांच्या प्रतिमा राज्यात उंचावल्या आहेत.