कॉंग्रेस आघाडीसोबत आली तर काय होईल आणि नाही आली तर काय होईल.! राष्ट्रवादी- शिवसेना एकत्र, कॉंग्रेस बी टिम म्हणून काम करणार.!
सार्वभौम (अकोले) :-
राज्यात सन २०१९ च्या विधानसभा झाल्यानंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. खरंतर, भाजप आणि शिवसेना सत्ता स्थापन करु शकत होती. मात्र, सत्तेच्या हव्यासापोटी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी शिवसेनेला बोहल्यावर चढविले आणि स्वत: कलवरे म्हणून महाविकास आघाडीच्या लग्नात मिरवत आहेत. आता ही जमवा-जमवी काही सहज घडून आली नाही. त्यासाठी संजय राऊत यांना पायाला भिंगरी बांधावी लागली. तेव्हा कोठे अडिच महिन्यानंतर महाविकास आघाडीचा मंडप उभा राहिला. अर्थात भाजपला नमविण्यासाठी कॉंग्रेसने स्वत:चे तत्व बाजुला ठेऊन सत्तेत सहभाग घेतला. राष्ट्रवादीचे काय हो.! कोणासोबतही बस्ता बांधायला तयार असते. फक्त सत्तेचे गुण जुळले पाहिजे. आता या सर्व इतिहासाचे उत्खनन का केले जात आहे? तर, राज्याप्रमाणे अकोले तालुक्यात सेम परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, दुर्दैवाने येथे भाजपला रोखण्याची कमी आणि साथ देण्याची भुमिका पुढे येत आहे. विशेष म्हणजे येथे शिवसेना असती तर ठिक आहे. परंतु, चक्क कॉंग्रेस इतकी ताठर भुमिका घेत आहे की, एकंदर, त्यांनी भाजपची बी टिम म्हणून लोक संबोधू लागले आहेत. तर, ज्या ना. बाळासाहेब थोरात यांनी राज्यात आघाडी स्थापन करताना जरा देखील ताठर भुमिका घेतली नाही. त्यापेक्षा अधिक गरज नसल्याची भुमिका अकोल्यात कॉंग्रेस घेताना दिसत आहे. त्यामुळे, आता शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्र लढणार असून. कॉंग्रेसने भाजपला मदत करण्यासाठी खुशाल एकटे लढावे. अशा पद्धतीची भुमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली आहे. आता कॉंग्रेस जर आघाडीत आली तर काय होईल आणि नाही आली तर काय होईल. हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यावर रोखठोक सार्वभौमने काही तज्ञाशी चर्चा केली आहे. त्यावरील हा वृत्तांत...!
अकोले नगरपंचायतीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात महाविकास आघाडी होऊन ते एकत्र लढतील अशा पद्धतीचे वातावरण होते. कारण, आम्ही एकत्र यायला तयार आहोत असे प्रत्येकजण म्हणत होते आणि ७ ते ८ जागा मागत होते. म्हणजे, गुतल्या गाईला फटके द्यायचे आणि आम्ही गो प्रेमी आहोत असे म्हणायचे. म्हणजे राष्ट्रवादीला फक्त १ जागा ठेवायची आणि आम्ही आघाडी करायला तयार आहोत म्हणायचं. याला टिंगल्या नाही तर काय म्हणता येईल.! गेल्या महिन्यापासून यावर तोडगा काढण्यासाठी मॅरेथॉन बैठक सुरु आहेत. परंतु, एबी फॉर्म वाटून दिले. तरी, यांच्यातील तिढा काही सुटायला तयार नाही. आता १३ डिसेंबर २०२१ रोजी माघारी अर्जची मुदत आहे. तरी देखील आघाडीचा जागावाटप प्रश्न सुटला नाही. एकंदर, शिवसेनेने नमते घेत प्रभाग १, ५ आणि १० यावर आपला भगवा फडकवून तयारी सुरु केली आहे. मात्र, कॉंग्रेलसला १, २, १५, १६ आणि ७ या जागा हव्या आहेत. यात, १ ही जागा शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक प्रमोद मंडलिक यांची असून तेथे महिला ओबीसी आरक्षण पडले आहे. त्यामुळे, मंडलिक यांच्या मातोश्री यांना तेथे उमेदवारी मिळावीच हा अग्रह सेनेचा होता. तो त्यांनी पुर्ण केला आहे. त्यामुळे, १ प्रभाग असणाऱ्या जागेवर ठाम असणारी कॉंग्रेस आघाडी तोडायला तयार आहे. मात्र, ती जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे, दोघांना समजून सांगताना आणि समजून घेताना डॉ. किरण लहामटे आणि सिताराम पाटील गायकर यांच्या नाकीनव आले आहे. त्यामुळे, दोन्ही एकमेकांच्या मतावर ठाम असून हा तोडगा जर पुर्वीच एकमेकांनी बसून काढला असता तर आज हि वेळ आली नसती. परंत, एकमेकांमध्ये असणारी राजकीय गुर्मी, नेत्यांचे कान भरवून देणारे कार्यकर्ते आणि केवळ गैरसमज यामुळे, आज टोकाची भुमिका जो तो घेऊ पाहत आहे.
आता या मतभेदाचा आणि मनभेदाचा किती तोटा महाविकास आघाडीला होणार आणि किती फायदा भाजपला होणार हे फार महत्वाचे आहे. परंतु, या सर्व प्रक्रियेत कॉंग्रेसने फार ताठर भुमिका घेतल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. वास्तवत: मधुभाऊ नवले हे राष्ट्रवादीतून भाजप आणि भाजपतून पुन्हा कॉंग्रेसमध्ये आले. तत्पुर्वी येथे कॉंग्रेसची काय आवस्था होती हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, पुर्वीचे कॉंग्रेसवासी इतकी ताठर भुमिका घेणारे नव्हते. परंतु, कम्युनिस्ट ते भाजप प्रवास केल्यानंतर पुन्हा कॉंग्रेसमध्ये आलेल्या भाऊंनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या वचन नाम्याप्रमाणे सर्वांस पोटास लावणे आहे ही भुमिका पार पाडायला हवी होती. त्या बहुजन नेतृत्वाच्या दृष्टीकोणातून ती कोणालाही दिसेनाशी झाली आहे. कारण, त्यांच्या अधिपत्याखाली कॉंग्रेस वेठीस धरली जात आहे, ऐव्हाणा सत्तेसाठी किंवा अस्थित्वासाठी इतका संघर्ष हा अनेकांना न पटणारा वाटतो आहे. म्हणजे हे फक्त सामान्य नेत्यांना व कार्यकर्तांनाच नव्हे.! तर, कॉंग्रेमधील काही नेते देखील हे बाहेर बोलुन दाखवतात. त्यामुळे, ज्या कॉंग्रेस पक्षासाठी किंवा कार्यकर्यांसाठी ते अधिकच्या जागा मागत आहेत. त्यातील काही नेते आणि कार्यकर्ते देखील म्हणतात त्यांचे हे अती होत आहे. म्हणजे, त्या वाल्ह्याकोळ्या प्रमाणे भाऊंची गत झाली आहे. त्यामुळे, जेव्हा नगरपंचायत आणि कारखान्याच्या बाबत तालुक्यात परिवर्तनाच्या नावाखाली रान पेटले होते. तेव्हा डॉ. लहामटे, गायकर पाटील आणि मधुभाऊ हेच तालुक्यात मातृत्वाची आणि दातृतवाची भुमिका पार पाडतील असे वाटत होते. परंतु, देण्याची वेळ आली तर देणारेच घेण्यासाठी जंग छेडू लागले आहेत. त्यामुळे, नेत्यांच्या तत्वांवर, निष्ठेवर आणि आदर्शावर विश्वास ठेवावा की नाही. असा प्रश्न उपस्थतित होऊ लागला आहे.
एकंदर, जर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढली तर त्यांना निवडणुक फार काही सोपी जाईल असे काही नाही. पण, अवघडही जाणार नाही. कारण, डॉ. लहामटे यांनी शहरासाठी आणलेला निधी आणि गायकर फॅक्टर हा महत्वाचा मुद्दा शहरात सहज चालुन जाईल. तर, भाजपही काही कमी नाही. त्यांच्याकडे देखील तगडे उमेदवार असून राष्ट्रवादीतील काही नेते त्यांच्या उमेदवारांना फॉर आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या अनेक ईच्छुकांना वाटते की, सत्ता येवो अगर ना येवोत, आपल्याला पक्षाचं तिकीट मिळालं पाहिजे. आपण, निवडणुक लढविली पाहिजे. अनेकांचा जीव लफडेबाजीत अडकला आहे. त्यामुळे, हे जुगाड काही साधं नाही. येथे पक्ष आणि नेतृत्व यावर निवडणुका होत नाहीत तर स्थानिक राजकारण, गल्ली बोळातील वाद, जागा-जमिनी, टाका-टूका आणि नातं-गोतं असे अनेक कांगोरे असतात. त्यामुळे, कोणाची कशी जिरवायची हाच खरा निवडणुक कार्यक्रम असतो. म्हणजे, एकेकाळी आम्ही राष्ट्रवादीत येतोय असे हात जोडून रामराम ठेकणाऱ्या मधुभाऊंना राष्ट्रवादीने प्रवेश नाकारला होता. आज तिच राष्ट्रवादी महाविकास आघाडी व्हावी म्हणून (मधुभाऊंकडे) कॉंग्रेसकडे हात जोडत आहे. त्यामुळे, तेव्हा त्यांची अवहेलना करणे हे आज त्याचे उत्तर आहे असे समजले तरी काहीच हरकत नाही.
एकंदर, कॉंग्रेस महाविकास आघाडीत आली तर भाजपला रोखण्यात त्यांना यश येईल. अन्यथा मतांचे विभाजन होऊन त्याचा शंभर टक्के फायदा भाजपला होईल. म्हणजे, उदा. प्रभाग क्रमांक 16 मध्ये रमेश जगताप यांचे प्राबल्य आहे. मात्र, त्यांची मते इतकी ही नाही. की, उमेदवार सहज निवडून येईल. तर, त्याच प्रभागात स्टँडींग नगरसेविका स्वातीताई शेणकर, संदिप शेणकर आहेत. त्यांच्याकडे देखील चांगली व्होटबँक आहे. तर, शिवसेनेचा देखील तेथे हातभार लागेल. आता जर हे लोक स्वबळावर लढले तर मतांचे विभाजन होऊन एकतारी भाजप-रिपाई तेथे अगदी सहज बाजी मारेल. म्हणजे दोघांचे भांडण आणि तिसऱ्याला लाभ. असेच चित्र पहायला मिळेल. त्यामुळे, कोणत्याही पक्षाने हवेत जाऊ नये. कारण, अशीच परिस्थिती बहुतांशी प्रभागांमध्ये आहे. यात कॉंग्रेस व्यक्तीगत लढली तरी त्यांना ज्या पद्धतीने ही निवडणुक सोपी वाटते. त्या पद्धतीने ती जाणार नाही. त्यांची गत भाजपच्या २०१९ च्या विधानसभा मतदार संघासारखी होऊ शकते. त्यामुळे, फार हवेत जाण्यात अर्थ करी काय.!
त्यामुळे, कॉंग्रेसचे सुत्र हाती घेतलेल्या मधुभाऊ नवले यांनी थोडी लवचिक भुमिका घेणे अपेक्षित आहे. गेल्या कित्तेक दिवसांच्या त्यांच्या राजकीय पडत्या काळचे रुपांतर चालत्या काळात झाले आहे. त्यांचा उभं रहायचा टाईम आणि पडायचा टाईम एकच होऊ नये असे अनेकांना वाटते आहे. आज, नगरपंचायत, उद्या कारखाना, पं. समिती, झेडपी यात देखील त्यांनी पुढाकार घेऊन मिळते-जुळते घेतले पाहिजे. आज, त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाने त्यांना नवी उभारी आली आहे. तर, त्यांना तज्ञ म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ते येणाऱ्या काळात टिकेचे धनी होणार नाही आणि महाविकास आघाडीचे नेतृत्व करतील अशी आशा बाळगुया....! कारण, महाविकास आघाडी झाली तर आजच पाच जागा ते विजयी आहेत आणि नाही झाली तर भाजप विजयाचे शिल्पकार तेच असतील.! अशीत चर्ची शहरात सुरु आहे.....