ब्रेकींग.! नवरीला मेहंदी लागताच संगमनेरातील व्यापाऱ्यांच्या मुलांनी दारु पिवून राडा केला, पोलिसांनी लग्नहॉलमधून थेट जेलमध्ये टाकले.!
सार्वभौम (इगतपुरी) :-
बीन बुलाऐं मेहमान पधारे, या म्हणीप्रमाणे संगमनेर शहरातील काही प्रतिष्ठीत व्यापाऱ्यांची मुले येथून थेट इगतपुरीमध्ये एका लाॅन्सवर गेले, तेथे गाजावाजा आणि ढोलीबाजा पाहिला अन जेवणाचे निमित्त म्हणा की लग्नात राडा करण्याचा हेतू म्हणा यांनी थेट हॉलमध्ये प्रवेश केला. मद्यधुंद आवस्थेत असणाऱ्या या व्यापाऱ्यांच्या मुलांनी नवरदेवाच्या भावाला धक्काबुक्की करायला सुरुवात केली. तेव्हा तेथे एकच खळबळ उडाली, हे कोणाचे बाजुचे पाहुणे आहेत? याची चौकशी सुरु झाली तेव्हा नवरीकडील म्हणाले आमचा आणि यांचा काही एक संबंध नाही. आणि नवरदेवाकडील लोक म्हणाले हे दारुडे वऱ्हाड आमचे नाही. जेव्हा या मद्यधुंद तरुणांकडे विचारणा केली. तर, यांनी थेट भर मेहंदीच्या कार्यक्रमात मारामाऱ्या करायला सुरुवात केली. याप्रकरणी नवरदेवाच्या भावाने इगतपुरी पोलीस स्टेशन गाठले आणि सहा जणांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मद्यधुंद तरुणांना बेड्या ठोकून अटक केली. ही धक्कादायक घटना दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी इगतपुरी येथील लॉन्समध्ये घडली. याप्रकरणी अक्षय सतीश बोराडे, प्रसाद केदारनाथ लोहे, तेजस सतीश बोराडे, ओम प्रकाश रासने, गोरख संजय काजळे (सर्व रा-संगमनेर ता संगमनेर जि अहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी. की, दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता बालप्रसाद सोमाणी (रा. लातूर) हे त्यांच्या भावाचा मुलगा सौरभ सोमानी यांचे लग्नासाठी लातुर येथुन कॅमल व्हॅली रिसॉर्ट इगतपुरी येथे आले होते. हे रिसॉर्ट त्यांनी तीन दिवसांसाठी बुक केलेले होेते. त्यामुळे, सोमाणी परिवार त्यांच्या नियोजित वेळी तेथे दाखल होणार होता. दि. 21 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी मेहंदीचा कार्यक्रम असल्याने हा परिवार रिसॉर्टमध्ये पोहचला. त्या दिवशी सुमारे 80 ते 100 वऱ्हाडी पाहुणे हजर होते. त्यांचा नियोजित कार्यक्रम सुरु होता. तोवर या मद्यधुंद मुलांनी कोणताही व्यत्यय आणला नाही. मात्र, रात्री 1:00 वाजता सर्व पाहुण्यांनी जेवन केले आणि लॉन्स मध्ये गप्पा मारणे सुरु झाले. तेव्हा एक व्यक्ती अचानक संशयास्पद गरके घालत असल्याचे लक्षात आले. त्याच्या काही हलचाली विचित्र वाटत होत्या, तेव्हा नवरदेवाच्या भावाने चौकशी सुरु केली. त्यांनी त्यांच्यासोबतचे आलेल्या पाहुणे मंडळींना विचारले की ही मुले तुमच्या ओळखीची आहेत का? आपले पाहुणे आहेत का? मात्र कोणाकडूनही सकारात्मक उत्तर मिळाले नाही.
दरम्यान, एक मद्यपी व्यक्ती हा नवरदेवाच्या खोलीकडे गेला व परत आला तेव्हा नवरदेवाच्या भावाने त्याबाबत त्या व्यक्तीला हटकविले आणि विचारले. की, तुम्ही कोणाकडून आले आहे.? तेव्हा त्यांनी नवरदेवाच्या भावासोबत बाचाबाची करुन भांडन सुरु केले. आम्ही कोठूनही असु, कुणाकडूनही असू तुला काय घेणेदेणे आहे? असे म्हणत थेट धक्काबुक्की आणि शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर तेथे हे सर्व मद्यपी तरुण आले. दारुचे नशेत असल्यामुळे त्यांनी एकच आरडाओरड सुरु केला. तेव्हा एकच गोंधळ सुरु झाला. हे सर्व वाद उफाळल्यानंतर रिसॉर्ट मालक राहुल झुलका, दिनेश हिंनानी व मकसुदम तिवारी यांनी सोडवासोडव केली. आपल्या शुभकार्याला विघ्न नको म्हणून नवरदेवाकडच्या लोकांनी शांतता घेतली. दारुड्यांच्या नादाला लागण्यापेक्षा लग्न आटपून निघून जाऊ या हेतूने वादावर पडदा टाकू असे म्हणत या मद्यपी तरुणांना तेथुन जाण्यासाठी सांगीतले. हे बहाद्दर तर्रर असल्यामुळे हे तेथुन निघुन गेले. मात्र, यांच्यावर देखील तेथे हात पडला होता, त्यामुळे यांनी काही वेळ जाऊ दिला आणि थोड्यावेळाने पुन्हा ते लॉन्समध्ये गेले. तेथे नवरदेवाच्या भावाशी वाद घातला. आरोपींपैकी दोघांनी नवरदेवाच्या भावाशी झटापट केली. त्यांना हाताच्या चापटीने मारहान केली, तसेच सर्वांनी वाईटसाईट शिवीगाळ केली. या झटापटीत नवरदेवाच्या भावाच्या गळ्यातील सोन्याची चैन कोणीतरी काढून घेतली.
दरम्यान, त्यानंतर नवरदेवाचा भाऊ यांनी रिसॉर्टचे मालक राहुल झुलका यांना पोलीस स्टेशनला फोन करण्यास सांगीतला. त्यानंतर रिसॉर्टमध्ये इगतपुरी पोलीस स्टॅशनचे पोलीस आले आणि 1) अक्षय सतीश बोराडे 2) प्रसाद केदारनाथ लोये 4) तेजस सतीश बोराडे 5) ओम प्रकाश रासने 6) गोरख संजय ताजळे (सर्व रा-संगमनेर ता संगमनेर जि अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. त्यानंतर फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आणि इगतपुरी पोलिसांनी सहा मद्यधुंद तरुणांना अटक केली आहे. हे तरुण त्या लाॅन्समध्ये बीना बोलविता काशासाठी गेले होते? त्यांना जेवायचे होते की लग्नात राडा घालायचा होता की काही चोरी करायची होती, याचा शोध आता इगतपुरी पोलीस घेत आहेत. मात्र, चांगल्या घरातील व्यापाऱ्यांची मुले मद्यपान करुन जर दुसऱ्यांच्या कार्यात असा नंगानाच करत असतील तर त्यांना कायदेशीर धडा शिकविला जाईल अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे. संगमनेर शहरात दारु, गांजा, गुटखा, मावा, ड्रग्ज यांना काॅलेज तरुणाई आहारी गेलीच आहे. पण, व्यापारी वर्गाची मुले देखील फार मोठ्या प्रमाणावर याचे बळी ठरले आहेत. असे तरुण इतरांचे विवाहात सुद्धा विघ्न आणतात आणि स्वत:च्या आयुष्याचे तर वाटोळे झालेच, पण दुसऱ्याच्या देखील आयुष्याचे वाटोळ करतात अशी प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.
