अकोले पोलिसांनी आरोपी आणि फिर्यादी दोघांकडून असे 20 हजार गाडीभाडे उकळवीले.! ऑडिओ व्हायरल.! हे साहेब म्हणजे, सामान्य मानसांचा कर्दनकाळ.! थेट गृहमंत्र्यांकडे पुरावे.!
अकोले पोलीस ठाणे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत राहले आहे. कधी चुकीचा आरोपी अटक करणे तर कधी लाचलुचपतचे छापे, कधी अधिकार्यांची मनमानी तर कधी पोलिसांनीच गुन्हेगारांना साथ देणे, म्हणजे येथे काम कमी आणि उपद्रव मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचा प्रकार वारंवार समोर येत आहेत. आता आणखी एक धक्कादायक प्रकार उघड करणार्या दोन ऑडिओ क्लिप माध्यमांच्या हाती लागल्या आहेत. अकोले पोलिसांनी गेल्या काही दिवसांपुर्वी एका तरुणीच्या फसवणुकीत जळगावहुन एक आरोपी अटक केला होता. त्यात आरोपीकडून 10 हजार रुपये गाडीभाडे आणि त्याच आरोपीला आणण्यासाठी फिर्यादीकडून 10 हजार रुपये गाडीभाडे असे 20 हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे. आता इतके करून पुन्हा हे 10 हजार रुपये बिल तपास फंडातून काढण्यास बिल टाकले नाही म्हणजे बरे.! म्हणजे एकाच गाडीचे बिल, दोन तीन ठिकाणांहून उकळविणे किती हुशारी म्हणावी लागेल. तर याच प्रकरणात काही अर्थपुर्ण तडजोडी देखील झाल्याचे संभाषण देखील समोर आले आहे. ही सर्व माहिती थेट आता गृहमंत्री यांच्याकडे एक तक्रारदार सुपूर्त करणार असल्याची माहिती त्याने दिली आहे. त्यामुळे, खुद्द पोलीस अधिक्षक साहेबांनी यात लक्ष घालुन याची चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
याबाबत सविस्तर माहीती अशी की, अकोले पोलीस ठाण्यात डॉ. किरण लहामटे यांच्या वरदहस्ताने बसलेले सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे जसे अकोले पोलीस ठाण्यात बसले आहेत. तेव्हापासून येथे किती भोंगळा कारभार चालतो याची प्रचिती समोर येऊ लागली आहे. जेव्हा येथे आरविंद जोंधळे होते तेव्हा त्यांनी कोणाच्या दबावाला भिक घातली नाही. याच पोलीस ठाण्यात ठाणे आंमलदाराच्या समोरुन टायर चोरी गेले. त्यास मदत कोणी केली? तर यात चौकशीअंती चौघे पोलीस दोषी निघाले आणि त्यांचे निर्भिड पोलीस अधिक्षक यांनी निलंबन केले. जोंधळे यांच्या काळात कारवाया आणि तपास देखील चांगले झाले. मात्र, सरळ झाडे नेहमी कुर्हाडीचे घाव सहन करतात, तसेच त्यांच्याबाबत झाले आणि त्यांना येथून बदलुन जावे लागले. तेव्हा त्यांनी पोलीस ठाणे सुतासारखे सरळ केले होते.
दरम्यान, त्यांच्यानंतर अभय परमार आले, परंतू त्यांचे मन अकोल्यात रमलेच नाही. म्हणून नंतर येथे कोण येणार? तर पोलीस निरीक्षकांची जागा असून देखील येथे सहायक पोलीस निरीक्षक घुगे यांची वर्णी लागली. मात्र, त्यांच्या पाठीशी फारसा अनुभव नसल्यामुळे येथील जनतेवर अन्याय होऊ लागला. म्हणून त्यांच्या बदलीची किंवा येथे पीआय दर्जाचा अधिकारी द्यावा म्हणून खुद्द माजी आमदार वैभव पिचड, राहुल देशमुख यांनी मागणी केली. मात्र, झालं काय? सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. त्यामुळे, एक लोकप्रतिनिधी म्हणून डॉ. लहामटे यांनी जो काही पुढाकार घ्यायचा होता. तो घेतला नाही. त्यामुळे, या बदलीमागे नेमके काय दडलं आहे? याबाबत अनेकांनी शंका कुशंका उपस्थित केली आहे.
आता या कलम 420 प्रकरणात घडले काय? तर एका तरुणीच्या फसवणुकीत पोलिसांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर आरोपीचा शोध सुरू केला. याला शोधायचं कसं? तर त्याच्या मोबाईल ट्रॅकींग नुसार त्याचा जळगाव येथे शोध लागला आणि पोलीस एका अलिशान खाजगी गाडीने जळगाव एमआयडीसीत दाखल झाले. तेथे त्यांनी आरोपीस ताब्यात घेतले. त्या ऑडिओ क्लिपमध्ये असे म्हटले आहे की, पोलिसांनी 10 हजार रुपये आरोपीच्या वडिलांकडून घेतले आणि ते अकोल्यात दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी याच आरोपीला शोधण्यासाठी महिला फिर्यादी यांच्याकडून देखील 10 हजार रुपये घेतल्याचे त्यात म्हटले आहे. म्हणजे त्यातील फार बारकावे गृहमंत्री यांच्याकडे केलेल्या तक्रारीत मांडलेले आहेत. परंतू यात आणखी कोणी किती अर्थपुर्ण तडजोड केली. याचा देखील त्यात उल्लेख आहे. त्यामुळे, माध्यमांच्या समोर येऊन एखादा गुन्हा उघड केल्याचे कौतुक नक्कीच केले पाहिजे. मात्र, त्यापलिकडे देखील काय घडले याची माहिती देणे अपेक्षित आहे. मात्र, दुर्दैवाने येथे तसे होताना दिसत नाही. कोणी अधिकार्यांना खुश करण्यासाठी पांचटपणा करतात तर कोणी पाट्या टाकण्याची कामे करतात. त्यामुळे, आजकाल सर्वच स्तंभ कोलमडून पडल्याचे पहायला मिळते आहे. मात्र, सार्वभौम आपल्याला बातमी मागणी बातमी नक्की देत राहील.
आता राज्यात तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांच्या शभंर कोटी संदर्भात राज्यात नव्हे देशात खळबळ माजली होती. त्यापुर्वी नगर जिल्ह्यातील अप्पर पोलीस अधिक्षक दत्तात्रय राठोड यांचे संबळ्या प्रकरण गाजले होते. या संदर्भात चौकशी सुरू होती, राठोड यांनी याचिका दाखल केली होती. ती हायकोर्टाने 1 जुलै 2021 रोजी कोर्टाने फेटाळली आहे. उलट कोर्टाने म्हटले आहे की, राठोड यांची नांदेड, भंडारा येथे अद्याप चौकशी सुरू आहे. आता पुन्हा ही ऑडिओ क्लिप त्यामुळे, पोलीस खात्याला खाली पहायची वेळ आली आहे. या प्रकरणानंतर पोलीस खात्याकडून किती ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. त्यामुळे, खरोखर वर्दीवर नको तसे डाग पडले. कारण, वर्दीत शंभर पैकी पाच दहा लोक वाईट असतील देखील, मात्र, 90 ते 95 लोक चांगले देखील आहेत. त्यामुळे, प्रत्येकाने वर्दीची शान राखली पाहिजे.
दरम्यान, या गाडीभाडे संदर्भात आाणि फसवणुक प्रकरणात नेमकी कोणाची फसवणुक झाली? हे अद्याप कळायला तयार नाही. या ऑडिओ क्लिपा किती खर्या आहेत आणि खोट्या याची चौकशी साहेबांनी केली पाहिजे. अन्यथा अशा प्रकारे जर सामान्य माणसाला आरोपींच्या शोधासाठी दहा-दहा हजार रुपये द्यावे लागत असेल तर कोणी पोलीस ठाण्याची पायरी चढेल का? पोलिसांवर लोकांचा विश्वास राहील का? खरंतर पोलिसांनी प्रत्येक गुन्ह्यासाठी तपास फंड मिळत असतो. संबंधित गुन्ह्यांच्या खर्चाची बिले पोलीस अधिक्षक कार्यालयात पाठविले असता ते पोलीस निरीक्षक यांच्या नावे मंजूर होऊन येतात. मात्र, तो देखील एक शोधाचा भाग आहे. आज अकोले शहरात सर्व धंदे खुलेआम सुरू आहे. वाळु वाहतूक अगदी चार नंतर देखील भरधाव वेगात शहरातून जातात. तरी देखील येथे साधी एक कारवाई देखील होत नाही. मी गुन्हेगारांचा कर्दनकाळ आहे, म्हणणारे नेमकी असे वाक्य वारंवार का म्हणतात? हा देखील एक संशोधनाचा भाग आहे. आता या प्रकरणात नेमकी कोणा-कोणाचे हात रंगलेले आहेत. हे थोड्याच दिवसात बाहेर येण्याची शक्यता आहे.