संगमनेरात 28 तर अकोल्यात दोन रुग्ण इंदोरी नव्याने कोरोना बाधित!



सार्वभौम (संगमनेर) :- संगमनेर शहरात 28 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे येथील कोरोना बाधिताची आकडेवारी 869 वर जाऊन पोहचली आहे. तर अकोले तालुक्यातील इंदोरी आणि लिंगदेव अशा दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यात लिंगदेव येथे जो रुग्ण दाखविला आहे. तो कायदोपत्री लिंगदेव असा दिसत असला तरी तो नक्की कोठे बाधित झाला आहे. याची माहिती प्रशासनाकडे नाही. तर तो कदाचित नवलेवाडी परिसरातील रहिवासी असू शकतो अशी संदिग्ध माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे रुग्ण कुठलाही असो प्रत्येक नागरिकांनी आपापली काळजी घ्यावी असे प्रशासनाने सांगितले आहे. तर संगमनेर तालुक्यातील काही डॉक्टर आणि अधिकारी यांच्याशी कोरोना बाधितांची माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता एकाही व्यक्तीने माहिती दिली नाही. अशी प्रचिती रोखठोक सार्वभौमच्या संगमनेर प्रतिनिधीस आली. त्यामुळे अखेर रात्री 10 नंतर प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तत्काळ माहिती दिली. दरम्यान, रॉपीड अँन्टीजन टेस्ट, खाजगी लॅब आणि जिल्हा प्रशासनाकडून येणारी आकडेवरी तसेच स्थानिक प्रशासनाची आकडेवारी यात प्रचंड तफावत आढळून येते. त्यामुळे, नागरिकांमध्ये फार संदिग्धता निर्माण झाली आहे. त्यामुळे, किमान पत्रकारांपर्यंत वस्तुनिष्ठ माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रशासनाने पीआरओ नेमणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतीही संदिग्ध माहिती पुढे जाणार नाही. 
                            दरम्यान काल संगमनेर तालुक्यात दिवसभरात 28 रुग्ण मिळून आले. त्यात कसारा दुमाला 31 वर्षीय तरुण, इंदिरा नगर येथे 33 वर्षीय तरुण, रंगार गल्ली येथे 46 वर्षीय पुरूष, घास बाजार येथे 54 वर्षीय पुरूष, गांधी चौक 42 वर्षीय पुरूष, इंदिरा नगर 65 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरूष, जानकीनगर 52 वर्षीय पुरूष, घोडेकर मळा 35 वर्षीय पुरूष, आश्वी बु येथील 20 वर्षीय तरुणी, निमज येथे 22 वर्षीय तरुण, जोर्वे येथे 21 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथे दोन 21 वर्षीय तरुण, मालुंजे येथे 41, 70 व 34, 21 वर्षीय पुरुष तसेच इंदिरानगर येथे 62,21 वर्षीय महिला तर 48, 21 वर्षीय पुरूष, नान्नज येथे 28, 21 वर्षीय तरुण, खर्डी येथे 46 व 24 वर्षीय महिला तर 6 व 4 वर्षीय दोन चिमुरड्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर घुलेवाडी येथे 24 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे 60 21 वर्षीय पुरुष, खंडोबा गल्ली येथे 38 वर्षीय पुरुष, खर्डी येथे 28 वर्षीय पुरुष असे 28 रुग्ण कोरोना बाधित मिळून आले आहेत. त्यामुळे शहरासह तालुक्यातील एकुण कोरोनाबधितांची संख्या आता 869 वर जाऊन पोहचली आहे. तर कोरोनाचे संक्रमण होऊन मृत्यू झालेल्याची संख्या 19 आहे.
                  तर अकोले तालुक्यातील इंदोरी येथे 45 वर्षीय पुरुष कोरोना बाधित मिळून आला आहे. आरोग्य प्रशासनाने रॅपीड अँन्टीजन टेस्ट केली होती. त्यात इंदोरीचा एक रुग्ण मिळून आला आहे. तर लिंगदेव (संदिग्ध) येथील 32 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. एका खाजगी रूग्णालयात तपासणी केली असता तो पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे आज अकोले तालुक्यात दोन रुग्ण मिळून आले आहेत तर अन्य काही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तसेच काही रिपोर्ट येणे बाकी आहे.
             दरम्यान जसजसे कोरोनाचे रूग्ण वाढत चालले आहेत. तसतचे सरकारी अधिकारी फोन घेण्यास, माहिती देण्यास आणि माहिती लपविण्यास माहिर होत चालल्याची टिका होऊ लागली आहे. अर्थात बातमी म्हणजे काही भिती नाही तर ज्यांच्या परिसरात रुग्ण मिळून आला आहे. तेथील लोक स्वत:हून काळजी घेतात, बाहेर पडणे टाळतात, प्रशासकीय नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न करतात. बाधित व्यक्तीची माहिती घेऊन आपण त्यांच्या संपर्कात आलो असेल तर स्वत:ला होमक्वारंटाईन करुन घेतात. असे अनेक फायदे वृत्तांमुळे होताना दिसतात. मात्र, प्रशासन माहिती देताना फोन का घेत नाही, किमान अहवाल आल्यानंतर दोन तासाने का होईना माहिती का देत नाही, कोणी मोबाईल बंद करुन ठेवतात तर कोणी कट करतात, कोणी मेसेज टाकतात तर कोणी उगच टाळाटाळ करताना दिसून येतात. त्यामुळे, जिल्हाधिकार महोदयांचे आदेश असताना देखील अशा पद्धतीची टाळाटाळ होत असेल तर त्यापासून समाजाचे नुकसान आहे. जर अर्धवट माहितीनुसार बातमी केली तर नागरिकांमध्ये संदिग्धता निर्माण होते. उटल भितीने वातावरण निर्माण होते. हे प्रशासनाचे अपयश दाखविण्याचे नाही तर समाज जागृतीचे काम आहे. हे प्रत्येक व्यक्तीने समजून घेतले पाहिजे.