मा.आ. वैभव पिचड यांचे आदिवासी मंत्र्यांना साकडे.! आदिवासी समाजासाठी खावटी सुरू करा.! अन्यथा...
राजूर (प्रतिनिधी):-
अकोले तालुका हा दुर्गम भाग असून तो आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. येथे प्रवरा, मुळा व आढळा नद्यांमुळे अर्धा अकोले तालुका सदन असला तरी राजूरच्या उत्तर, दक्षिण व पश्चिमेस सर्वत्र आदिवासी समाज अगदी हातावर पोट भरतो. रोज काम केले तरच चुल पेटते अशी नाजुक परिस्थिती या भागात आहे. मात्र, कोरोनासारख्या वादळाने येथील जनतेची रोजीरोटी धुळीस मिळली असून यांच्यावर उपासमारीचे सावट उभे राहिले आहे. त्यामुळे शासनाने आदिवासी भागासाठी खावटी सुरू करावी. अशी मागणी माजी आमदार वैभव पिचड यांनी आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्याकडे केली आहे.
देशात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. आशा भयानक परिस्थितीत शहरातील कुटूंब बेरोजगार झाले असून अनेकांच्या हताला काम नाही. त्यामुळे शहरासारख्या ठिकाणी उपासमारीची वेळ आली असून ग्रामीण भागातील आदिवासी समाजाचे काय हाल असतील हे नव्याने सांगायला नको. निट अभ्यास केले तर लक्षात येते की, राज्यात संचारबंदी व जमाबंदी (144) लागू आहे. जो-तो घरात बसला असून ज्यांची आर्थिक उन्नती झाली आहे. त्यांना दोन वेळच्या अन्नाचा कोणताही प्रश्न पडत नाही. मात्र, नोकरीसाठी बाहेर गेलेला अकोले तालुक्यातील आदिवासी समाज कोरोनाच्या भितीपोटी गावाकडे परतला असून त्यांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने राज्यातील जनतेचा विचार करताना आदिवासी समाजाचा देखील विचार करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतुद करुन येथील नागरिकांना मोफत खावटी सुरू करावी. अशा मागणीचे पत्र माजी आमदार वैभव पिचड यांनी आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांच्याकडे केली आहे.
तर समाज रस्त्यावर उतरेल.!
- मा.आ. वैभव पिचड
- अकोले तालुक्यातील आदिवासी जनतेला सद्या दोन वेळच्या अन्नासाठी झगडावे लागत आहे. या समाजावर अजून आणिबाणीसारखी वेळ येण्याच्या आत त्यांचे मुलभूत प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. ही शासनाची संवैधानिक व नैतिक जबाबदारी असून तत्काळ आदिवासी जनतेसाठी मोफत खावटी सुरू करावी. योग्यवेळी हा प्रश्न मार्गी लागला नाही तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल व पोटासाठी नाईलाजाने जनतेला रस्त्यावर यावे लागेल. त्यामुळे शासनाने तत्काळ या मागणीची दखल घ्यावी.
------------------------
आकाश देशमुख
(राजूर प्रतिनिधी)
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)