विद्यार्थीनींशी अश्लिल चाळे, पिचड शिक्षकाला चपलाने चोपले; अकोल्यातील वाघापूरची घटना, गुन्हा दाखल.!

               
अकोले (प्रतिनिधी) :- 
               अकोले तालुक्यातील वाघापूर परिसरात गंभीरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पिचड नामक शिक्षकाने वर्गातील अनेक विद्यार्थीनिंची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलींनी दिलेल्या माहितीनंतर पालक जागरुक झाले आणि आज गुरुवार दि.२६ रोजी वाघापूर येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन पिचडला चांगलाच चोप देत चपलाने मारहाण केली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिय सुरु आहे.
         खरतर राहुरी येथे एका शिक्षकाने वर्गातील मुलींची छेडछाड काढल्याने त्यास न्यायालयाने ३ वर्षाची शिक्षा ठोठावून काही दिवस होतात कोठे नाहीतर आज अकोल्यात शिक्षकाची नैतिक व सामाजिक जबाबदारी वेशीवर टांगली गेली आहे. विद्यार्थी हा परक्याचे लेकरू नाही तर आपला मित्र आहे, पोटच्या लेकरासारखं त्याला जपावे असे सांगत शिक्षकांसाठी देशात नाही तर विदेशात कार्यशाळा होऊ लागल्या आहेत. मात्र, या विचारांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आज आठवडाभरापुर्वी एक शिक्षिकाच एक मुलास लैंगिक छळासाठी प्रवृत्त करीत असल्याचा गुन्हा दाखल झाला. हे असले "घृणासपद" प्रकर ऊघड होऊनही काही शिक्षकांची मानवी संवेदना जागी होत नाही. हे शिक्षकी व्यवस्थेला काळींबा फासणारे आहे. विशेष म्हणजे अकोले तालुक्यात अशा घटना घडतात हे काही नवे नाही.
          खरंतर वाघापूर हे प्रकरण हे एक नाममात्र आहे. परंतु, आदिवासी आश्रमशाळा आणि होस्टेल तसेच झेडपीच्या प्राथमिक शाळा आणि शासकीय विद्यालये, यात देखील हे प्रकार सर्रास घडताना दिसत आहे. मात्र, बोलावं तर शिक्षण बंद होतय आणि आवाज उठवावा तर आई-वडिलांची इज्जत चव्हाट्यावर येते आहे. त्यामुळे, ही समाज व्यवस्था घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी देखील चालू देत नाही. यात मुलींची सर्वात मोठी घुसमट झाल्याचे दिसते आहे. अकोले तालुका हा आदिवासी तालुका मानला जातो, त्याच बरोबर येथील पुरोगामी विचारधारा राज्यात लैकिक आहे. पण, तुम्हाला धक्का बसेल.! की, राजूर आणि अकोले या दोन्ही ठिकाणी बलात्कार आणि छेडछाडीचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही अकडेवारी सांगते. याहुन धक्कादायक माहिती अशी. की, आदिवासी भागात मुलींवर होणारे अत्याचार अवाजवी असून ते वारंवार दडपले गेल्याच्या तक्रारी शासन दरबारी जमा आहेत. त्यामुळे, तालुक्यात चाईल्ड लाईन तसेच बालक, विद्यार्थी व सेवाभावी संस्थांनी जनजागृती करणे फार गरजेचे आहे.
        आता वाघापूर येथील शिक्षकाने जो काही प्रकार केला. तो आजचा नवा नाही. तो वारंवार असे प्रकार करीत असल्याचे उघड झाले आहे. याला जबाबदार कोण ? तर पालक संघ, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व गटशिक्षण अधिकारी यांना पहिला जाब विचारला पाहिजे. या जबाबदार व्यक्तींनी विद्यार्थ्यांशी वारंवार संवाद ठेवणे आवश्यक आहे. मुलींचे समुपदेशन करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांच्याशी मैत्रीचे संबंध प्रस्तापित करणे, हे महत्वाचे आहे. पण, दुर्दैव असे. की, मुलांना आपला गटशिक्षण अधिकारी व केंद्रप्रमुख सोडा मुख्याध्यापक कोण हे सुद्धा माहित नसते. मुले शाळेतून घरी कधी जातात, शाळेत कधी येतात याची नोंदवही देखील मेन्टेन केल्याचे कोठे दिसणार नाही. तुम्हाली आठवत असेल.! गेल्या आठवडाभरात दोन मुलांनी अपहरणाचा बनाव रचला आणि पोलीस प्रशासन आणि कुटुंबाला वेठीस धरले. शाळा हे संस्कारक्षम विद्यापिठ आहे. की, कट, कारस्थान शिकण्याचे केंद्र.! हेच कळायला तयार नाही. मुले मुली शाळेच्या नावाखाली तालुक्यात येतात आणि बस स्टँण्ड, नदिकाठ आणि शहरातील काही हॉटेलांमध्ये खुशाल औयाशी करत बसतात. तरुण मुले तर सर्रास गांजांची तस्करी करतात. हा गांजा अगस्ति थेटरच्या जवळचा बादशाह पोलिसांच्या वरदहस्ताने वितरीत करतो. तरी पोलीस याकडे डोळेझाक करतात.
          अर्थात या सर्व विघातक वृत्तीला पालकांचे देखील खतपाणी आहे. मुलांचे आयुष्य उध्वस्त होऊ नये म्हणून एका पत्रकाराने यावर आवाज उठविला होता. तर, पालकांनी संबंधित पत्रकारास सुनावले.! आमची मुले उघडी नाचूद्या.! तुम्हाला काय घेणे ? तस्करी करीत असतील, गांजा फुकत असतील तर लादेन होतील. तुम्ही समाज्याचा ठेका  घेतला आहे का ? वा रे.! पालक. जर अकोल्यातील मुले गांजा ओढून लादेन आणि विरप्पन होणार असतील. तर, अशा पालकांची वसाहत कोकण कड्याच्या जवळ निर्माण करुन दिली पाहिजे. परंतु, पालकांच्या अशा वागण्याने येणारी पिढी बरबाद होऊ शकते. हे बाकी नक्की.! तर, दुसरी बाजू म्हणजे.! या पालकांना त्यांच्या उत्तराची किंमत त्यांच्या उतारवयात नक्कीच कळेल.
           आज अकोल्यात पोलिसांनी एका लॉजवर छापा टाकला. त्यात सहा विद्यार्थी मिळून आले आहे. पालकानी नम्रतेची भुमिका घेत मुलांना पाठीशी घातले. पण, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक नेमके कोठे कमी पडतात. यावर विचारमंथन करण्याची गरज आहे. हे असेच चालत राहिले. तर, पिचड सारखे शिक्षक विद्यार्थ्यांच्या हतबलतेचा फायदा घेत राहतील.! तात्पुरते पालक उद्रेख परावर्तीत करतील आणि समाज मज्जा बघत बसेल. शाळेला कुलूप ठोकून ज्ञानाची मंदिरे बंद केल्यासारखे आहे. खरा धडा तर प्रशासकीय जबाबदार अधिकाऱ्यांना दिला पाहिजे. कारण, त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या व्यवस्थेला लगाम घालणे हे त्यांचे काम नव्हे.! तर, जबाबदारी आहे. त्यांनी लगाम ढिला सोडला म्हणून तर हे घोडे बेफाम उदळून असे  कृत्य करु लागले आहेत. त्यामुळे, पालकांनी हा जाब प्रशासनाला नक्कीच विचारला पाहिजे.!

सागर शिंदे

(क्राईम रिपोर्टर)