कोणी निंदा नालस्ती केली आणि कितीही आडकाठ्या घातल्या तरी तरी मी अगस्ति बंद पडू देणार नाही-चेअरमन

 

सार्वभौम (अकोले) :- 

जशा निवडणुका पार पडल्या आहेत, तेव्हापासून कारखाना आणि माझ्यासह संचालक मंडळावर आरोप प्रत्यारोपांच्या तोफा डागल्या जात आहेत. माझ्यावर तर चारही बाजुंनी नको नको तसे आरोपांचे हामले होत आहेत. पण, माझी निंदा नालस्ती केली तरी मी अगस्ति कारखाना बंद पडू देणार नाही, येथील शेतकर्‍यांनी जो विश्‍वास आमच्यावर टाकला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही. वेळ आली तर कारखान्यासाठी कोणताही कटू निर्णय घेईल. कोणाच्याही विरोधात दंड थोपटेल. मात्र, जोवर कारखान्यात आम्ही आहोत तोवर ही भाग्यलक्ष्मी बंद पडू देणार नाही. अशा प्रकारचे अश्‍वासन अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.

दि. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी अगस्ति सहकारी कारखाना मोठ्या संघर्षयम पद्धतीने सुरू झाला होता. तब्बल १३६ दिवस कारखाना अविरत सुरू राहिला. या दरम्यान अगस्तिच्या कार्यक्षेत्रात आणि गेटकेन असा ३ लाख ९८ हजार मे. टन ऊसाचे गाळप करण्यात आले. त्यातून ४ लाख ३२ हजार इतक्या सारखा पोत्यांचे उत्पादन घेण्यात आले आहेत. तर यात १०.९० असा साखर उतारा मिळाला आहे. वास्तवत: कार्यक्षेत्रात ऊसाचे उत्पादन कमी झाल्यामुळे यंदा कमी गाळप झाले आहे. तर येणार्‍या हंगामात देखील सरासरी २ लाख मे.टन ऊसाचे उत्पादन आहे. त्यात तिरीचे खोडवे मोडल्यामुळे काही समस्या आल्या असून अशा प्रकारच्या समस्या ह्या नैसर्गिक आहे. कारण, कधीकाळी काही पिकांना बाजार आले की लोक ऊस उत्पादन कमी किंवा खोडवे मोडतात. आता काद्यासह अनेक पिकांना बाजार नाही. त्यामुळे, हा काळ फार काही दिवस राहणार नाही.

गायकर पुढे म्हणाले की, गेली सहा महिन्यापासून कारखान्यावर आणि वैयक्तीक माझ्याबाबत काय-काय झाले हे सर्वश्रुत आहे. कोणी म्हणे कारखाना कडेलोटावर आहे. तर, कोणी म्हणाले कारखान्यात कोट्यावधींचा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे, कारखाना चालणार नाही, सभादसांचे पेमेंन्ट होणार नाही, ऊस तोडणी कामगारांना पैसे देता येणार नाही, कर्मचार्‍यांचे पगार होणार नाही. मात्र, यापैकी कोणतीही गोष्ट खरी ठरली नाही. थोडेफार इकडे-तिकडे, मागे-पुढे झाले असेल. मात्र, कारखाना चालु राहिला आणि तो येणार्‍या काळात देखील चालुच राहणार आहे. कारखाना चालु राहण्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करणार आहे. कोण काही म्हणेल हे आजकाल माझ्यासाठी अर्थशुन्य आहे. मात्र, कारखान्यासाठी काय महत्वाचे आहे ते माझ्यासाठी लाख मोलाचे आहे.

अगस्ति कारखान्याचा पट्ट पडणे म्हणजे आता पुढील हंगामाची तयारी करणे आहे. येणार्‍या काळात अगस्तिच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस वाढविणे, खोडवे रोखण्यासाठी शेतकर्‍यांशी अधिक प्रभावी संवाध साधणे, शेतकर्‍यांना कारखान्याकडून काय सेवा सुविधा देता येईल याचा विचार करणे, गेटकेनचा ऊस, ऊस तोडणी कामगार तसेच नव्याने कारखान्यासाठी निधी उभा करणे अशी अनेक आव्हाने आहेत. मात्र, यात मी एकच गोष्ट मोठ्या निर्धाराने सांगतो. की, लोक काय म्हणतील आता याची मला चिंता नाही. येणार्‍या काळात देखील मला कोणतेही राजकारण करायचे नाही. जो सभासदांनी आमच्यावर विश्‍वास टाकला आहे. तो सार्थ ठरविण्यासाठी तथा कारखाना ताठ उभा राहण्यासाठी मला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो मी घेईल. पण, कारखाना बंद पडू देणार नाही. मायबाप शेतकर्‍याने आपल्या भाग्यलक्ष्मीसाठी फक्त ऊस ऊत्पादन घेऊन आम्हाला सहकार्य करावे. बाकी जग इकडचे तिकडे झाले तरी आम्ही कारखान्यासाठी आणि सभासदांना दिलेल्या शब्दासाठी कटीबद्ध आहोत.!