नागरिकांनो थोडी तरी लाज बाळगा.! तुमचे माकडचाळे पाहुन मोदीजींनी तोंडात मारुन घेतली तर नसेल ना.!


संपादकीय :- 
            जनतेचे अज्ञान आणि व्यक्तीप्रेम म्हणजे काय? हे काल आपल्याला अनुभविण्यास मिळाले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यु घोषित केला होता. 14 तासानंतर ज्यांनी या कर्फ्युला स्वयंप्रेरणेने प्रतिसाद दिला त्यांच्यासाठी व जे पोलीस आणि डॉक्टर स्वत:च्या जिवाची काळजी न करता कोरोना विरोधात लढत आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवून केवळ धन्यवाद म्हणा किंवा अभिवादन करायचे होते. पण दुर्दैव असे की, भारतातील अंधभक्ती बाळगणारी जनता म्हणजे किती मुर्खपणाचा कळस गाठवू शकते. याचे उत्तम उदाहरण काल पहायला मिळाले. कोणी भांडी वाजवून ती चेमटून टाकली, कोणी टिकटॉक व्हिडिओ काढण्यासाठी बुजुर्ग व्यक्तींचा वापर केला. इतकेच काय! शिकल्या सवरलेल्यांनी भांडीकुंडी हातात घेऊन चक्क रोडशो करण्यासाठी रॉली काढली. यात अणखी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे रस्त्यावर गर्दी करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला होता. म्हणजे आपण कोणाला निवडून दिले आणि कोण आपल्या जिवावर उठले आहे. हे नव्याने सांगायला नको. पण खरच असे मनातून वाटते की, जर हा सगळा प्रकार पंतप्रधान महोदयांनी पाहिला असेल तर त्यांनी नक्कीच तोंडात मारुन घेतली असेल.
काय करावं बुवा या लोकांना.!!
   
  देशात कोरोनाचे संशयीत आणि बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरी देखील देशातील नागरिकांना त्याचे गांभीर्य नाही. खरतर जेव्हा देशात एक देखील संशयीत नव्हता, तेव्हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चीनच्या धार्मिक स्थळावर गो कोरोना..! कोरोना गो..! अशा प्रकारची घोषणा केली होती. त्यानंतर चीन लोकांनी त्याला भावनिक प्रतिसाद देत गांभीर्याने घेतले. मात्र, भारतीयांनी त्यावर टिका करीत त्याचा टिकटॉक तयार केला. त्या व्हिडिओला एडिट करुन त्याची खिल्ली उडविण्यात आली. मात्र, या देशाचे दुर्दैव असे की, त्यानंतर अगदी काही दिवसात हा कोरोना भारतात येऊन पोहचला आणि यांची पळता भुई थोडी झाली. काल ज्यांनी आठवले यांच्या प्रार्थनेची खिल्ली उडविली आज तेच म्हणू लागले होते. या आजाराला गमतीने घेऊ नका. याची खिल्ली उडवू नका. किती मोठा विरोधाभास आहे ना हा? अर्थातच आठवले साहेबांना सगळेच विनोदाने घेताता. मात्र, त्यांच्यानंतर चक्क भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या वक्तव्याचा देखील जनतेने विपर्हास करावा, हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. खरंतर मोदी साहेबांनी देशात तत्काळ जनता कर्फ्यू लागू केला. त्यांचे खर्‍या अर्थाने कौतुक करावे तितके कमीच आहे. 
             
  वास्तवत: 21 मार्च या दिवशी मध्यरात्री सुर्याचे दक्षिणायन सुरू होते. त्या दिवशी दिवस आणि रात्र समांतर असतो त्यास इक्विनॉक्स असे म्हणतात. त्यानंतर दुसरा दिवस म्हणजे 22 मार्च असतो. सुर्याची अतिनिल किरणे लंबरुप पडू लागतात, तेव्हा भारतात प्रखर उन असते. त्यामुळे त्या दिवशी खरोखर उन्हाची तिव्रता जास्त असते. त्या दिवशी सगळ्या देशाने कर्फ्यु पाळला. मात्र, सायंकाळ झाली आणि आपण दिवसभर घरात राहुन मोदी साहेब व देशावर उपकारच केला आहे की काय! असा अविर्भाव काही नागरिकांनी अंगी बाळगला.कधी एकदाचे आपण बाहेर पडून थाळ्या बडवून कोरोना संपविल्याचे श्रेय्य लुटतोय असा उताविळपणा गावागावात पहायला मिळाला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, लोकांनी जमावबंदी (कलम 144) लागू असतांना गल्ली-गल्लीतून, गावा-गावातून रॉली काढली, चौकाचौकात लोकप्रतिनिधींनी डिजे वाजविले. काही अंधभक्तांनी ढोल ताशे वाजवून मिरवणुका काढल्या.
                    लहान मुलांनी तर दहा पंधरा मिनिटे सोडा तब्बल तासतास थाळ्या वाजविल्या. शहाण्या सुरत्या मानसांनी भले जाड-जाड भांडी वाजवून-वाजवून चेमटून टाकली. ही लोक शिकली सवरली म्हणजे नेमके यांनी काय ज्ञान संपन्न केले. हे अनेकांना न समजणारे आहे. कारण, मोदींच्या एका शब्दावर देश बंद झाला. मात्र, त्यांच्या एक शब्दाचा विपर्यास करुन नको ते वर्तन देशात पहायला मिळाले. जी लोकं दिवसभर घरात बसली ती सायंकाळी रस्त्यावर उतरली. मग केलं त्यावर सगळं पाणीच फिरलं म्हणायचं की. एक चिकीत्सकता म्हणून जर एक साधा सर्वे केला की, 22 मार्च रोजी सायंकाळी 5 ते 6 या एक तासात किती भांडी चेंबटली, तर तो आकडा एकल्यानंतर तुमच्या भुवया उंचावून तुम्हीच तोंडात मारुन घ्याल.
                 बरं याहुन एक दुर्दैवाची गोष्टी अशी की, आपण भांडी का बडवतोय, आपण मिरवणुका का काढतोय, आपण जल्लोष का करतोय? याची जरा देखील कल्पना अनेक महाशयांना नव्हती. मात्र, एक मेसेज बाकी भारी फिरला. काय तर म्हणे भांडी वाजविल्यानंतर त्याच्या ध्वनिलहरीच्या कंपनाने कोरोना दुर जातो किंवा मरुन पडतो. हे कारण एकल्यानंतर जनतेच्या विचारसारणीची किव तर आलीच. मात्र नकळत हासू देखील आले. मग जर असे होत असेल तर प्रशासनाने हजारो डेसिबलने डिजे वाजवून कोरोना नाहिसा केला नसता का? या देशात शिकलेल्या लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात अज्ञान आहे. हे या निमित्ताने पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले.
             
 तुम्ही एका गोष्ट अनुभविली असेल. 22 मार्चला लोकं घरात बसले. सायंकाळी बाहेर आले आणि एक दिवस घरात राहुन त्यानी जणू कोरोनाचे समुळ उच्चटन केले. असाच काहीसा गैरसमज मनात बाळगून खुशाल दुसर्‍या दिवशी बाहेर पडले. काही महाशय तर गरज नसतांना गोवा गुटखा व दारु पिण्यासाठी बाहेर पडल्याचे दिसले. त्यामुळे, वैतागलेल्या पोलिसांनी काठीच्या सहाय्यने चांगले तंबाखुसारखे मळले. अर्थात नशिब जनतेचे कोणाचा मानव अधिकार जागा झाला नाही. नाहीतर पोलीस नेहमीप्रमाणे टिकेचे धनी ठरले असते.
                        खरंतर देशात आणिबाणीची परिस्थिती निर्माण झालेली असतांना तीन कर्मवीर कामावर आहेत. ते म्हणजे पोलीस, डॉक्टर व पत्रकार. हे समाजासाठी स्वत:च्या जिवाशी खेळत असतांना लोक त्यांचे कौतुक करण्यासाठी डिजे वाजवू शकतात, थाळ्या वाजवू शकतात, फटाके वाजवू एकतात, रस्त्यावर उतरु एकतात, त्यामुळे, यांच्याइतकी जागरुकता कोठे असू शकते का? आणि हे घडू शकते ते फक्त भारतातच. अन्यथा इटली आणि चीन सारख्या देशांत मडे (मृतदेह) उचलण्यासाठी देखील कोणी रस्त्यावर उतरण्यास तयार नाहीत. जो देश मानुसकीपेक्षा दगडाला मोठेपण देतो. ते मंदिरे देखील बंद झाली आहेत. ज्या विज्ञानाच्या जोरावर प्रगती करून निसर्गाची हानी केली. तो निसर्ग देखील कोपला असून विज्ञानाने परिस्थितीपुढे हात टेकले आहे. त्यामुळे पैशाच्या मागे धावणार्‍या मानसाला कधी अक्कल यायची तर येऊ..!
सागर शिंदे
८८८८७८२०१०
 ============
       "सार्वभाैम संपादक"
       
           सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
                -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे १९ लाख वाचक)