तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच याच्याकडून अत्याचाराचं गिफ्ट, फोटो व्हायरल करण्याची धमकी, प्रियकरावर गुन्हा दाखल.!
सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) :-
एका 18 वर्षीय मुलीसोबत कॉलेजला चारचाकीत सोडवताना ओळख झाली. मंग काय, तो सारखा मुलीला फोन करत असे. जेव्हा 18 वर्षीय पिडीत मुलीचा बर्थडे होता. तेव्हा तो म्हणाला की, तुझा बर्थडे साजरा करायचा आहे. केक कापायचा आहे. तिला रात्री बारा वाजता केक कापण्यासाठी बोलवले आणि बर्थडे गिफ्ट पाहिजे असे बोलुन नको ते चाळे करून तिच्याशी जबरी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना 29 मार्च 2026 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या दरम्यान कौठेकमळेश्वर परिसरात घडली. जेव्हा घडलेला प्रकार दुसऱ्या दिवशी आई वडिलांना सांगितला तेव्हा त्यांना प्रचंड राग आला. त्यांनी थेट तालुका पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. त्यावरून सोमनाथ काशिनाथ बढे (रा. मेंढवण, ता. संगमनेर) यांच्याविरोधात बलात्कारसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिडीत 18 वर्षीय मुलगी ही उच्चशिक्षणासाठी लोणी येथे जाऊन येऊन करते. ती रोज कॉलेजला जात असल्याने रस्त्यावर येणाऱ्या साधनाला हात करते. मात्र, आरोपी सोमनाथ बढे हा इकोगाडीतुन रोज कॉलेजच्या दिशेने जात असुन आणि कॉलेजच्या वेळेत जात असल्याने त्याची भेट ह्या 18 वर्षीय मुलीसोबत रोज होत असे. पिडीत 18 वर्षीय तरुणी देखील त्याच्यावर विश्वास ठेऊन गाडीत बसत होती. परंतु, त्याची माणुस म्हणुन या पिडीत मुलीवर वाईट नजर होती. सहामहिन्यांपासुन पिडीत मुलीने कॉलेजला जायचे बंद केले. परंतु, आरोपी सोमनाथ बढे हा फोनकरून मुलीला नेहमी त्रास देत होता. दि. 28 मार्च रोजी पिडीत मुलीचा वाढदिवस असल्याने त्याने पीडीत मुलीला रात्री 11 वाजता फोन करून म्हणाला की, मी तुझ्या घराच्या पाठीमागील बाजुस आलो आहे. मला तुझा बर्थडे सेलिब्रेशन करायचा आहे. तु घरात कोणाला ही न सांगता ये.
दरम्यान, पिडीत 18 वर्षीय मुलगी ही नकार देते. घरात आई वडील जागे आहेत असे कारण देऊन मी येऊ शकत नाही असे स्पष्ट सांगते. त्यानंतर आरोपी सोमनाथ बढे म्हणाला की, आई वडील झोपल्यानंतर तु ये मी तुझी वाट पाहत आहे. असे म्हणुन त्याने फोन कट केला. त्यानंतर काही वेळाने आई वडील झोपल्यानंतर पिडीत 18 वर्षीय मुलीने घराची कडी उघडली आणि घराच्या पाठीमागील बाजुस गेली तेव्हा आरोपी सोमनाथ हा केक घेऊन उभा होता. पिडीत 18 वर्षीय मुलीने केक कापुन बर्थडे साजरा केला. त्यानंतर काही वेळाने पिडीत मुलीला वेळ झाल्याने ती घरी जाण्यासाठी निघाली. परंतु, आरोपी सोमनाथ बढे यातील राक्षसीवृत्ती जागी झाली. त्याने पिडीत मुलीचा हात धरून ओढले आणि म्हणाला की, माझे बर्थडे गिफ्ट कुठे आहे. असे बोलुन तो नको ते चाळे करू लागला. त्यांच्यातील राक्षसीवृत्तीने तो पिडीत मुलीला सोडत नाही. त्याने पिडीत मुलीला धमकी दिली की तु जर नाजुक संबंधाला नाही म्हणाली तर तुझे आणि माझे मोबाईल मधील फोटो व्हायरल करील असे म्हणून त्याने पिडीत 18 वर्षीय मुली सोबत जबरी संभोग केले.
दरम्यान, नराधम सोमनाथ बढे याची भुक भागल्यानंतर त्याने पुन्हा धमकी दिली की, या बद्दल तु कोणाला काही सांगितले तर तुझी बदनामी करेल. असे म्हणल्यानंतर पिडीत मुलगी ही घाबरते. ती शांत घरी येऊन झोपते. दुसऱ्या दिवशी ती आई वडिलांना सांगण्याची हिम्मत करते. त्यानंतर आई वडील हे नातेवाईकांना बोलवून घेडलेला प्रकार सांगितला. त्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. त्यांनी आरोपी सोमनाथ बढेला पाठीशी न घालता. थेट तालुका पोलीस ठाणे गाठले व घडलेला सर्व प्रकार पोलिसांपुढे कथन केला. पोलिसांनी तक्रार दाखल केली. त्यावरून सोमनाथ काशिनाथ बढे (रा. मेंढवण, ता. संगमनेर) यांच्याविरोधात बलात्कारसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.
