अकोल्याच्या प्रतिष्ठीत व्यक्तीवर संगमनेरच्या महिलांचा हनीट्रॅप.! ब्लॅकमेल करुन मागितली तीन लाखांची खंडणी.! मोठा सेक्स कॅन्डल उघड होणार.!
सार्वभौम (अकोले) :-
नगर जिल्ह्यात पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांप्रमाणे सेक्स कॅन्डल चालविणार्या महिला आहेत. प्रतिष्ठीत व धनबलाढ्या व्यक्तींना प्रेमाच्या जाळ्यात फसवायचे आणि त्यांचे अश्लिल व्हिडिओ काढून त्यांनाच ब्लॅकमेल करायचे. थोडी ना थिडकी लाखो रुपयांची मागणी करायची आणि नाही दिली तर चार चौघात मारहाण करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत दहशत निर्माण करायची. त्यामुळे, प्रतिष्ठेपोटी कोणताही पुरुष नम्र होऊन या हनी ट्रॅपचा बळी जातो. मात्र, अकोल्यातील एक व्यक्तीने केवळ आपण बळी गेलो म्हणून अन्य तरुण आणि पुरूष अशा महिलांचे शिकार होऊ नये. यासाठी पुढे येऊन स्वत: फिर्यादी होत महिलांसह ट्रॅपचा कट रचणार्या तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी उघड केला असून मुळत: ज्या व्यक्तीने फिर्याद दाखल केली. त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. आता अशा प्रकारे जर कोणाची फसवणुक झाली असेल तर त्यांनी स्वत: पुढे येऊन अकोले पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन घुगे यांनी केले आहे. पुढे येणार्या प्रत्येक व्यक्तीचे नाव गोपनिय ठेवले जाईल अशी शाश्वती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत घडलेली सविस्तर माहिती अशी की, संगमनेरच्या एका महिलेने अकोले तालुक्यातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीला फोन केला. साहेब.! जेवण झाले का? चहापाणी झाले का? अशी विचारणा करुन थेट लागट सुरू केली. तेव्हाच या व्यक्तीला संशय आला की, ओळख ना पाळख ही महिला असे का म्हणते आहे. त्यानंतर यांच्यात चर्चा झाली. कालांतराने व्हाटसअॅप चॅटींग आणि लागलीच एक महत्वाचे काम आहे असे म्हणून आठवड्याभरात संगमनेर येथे भेटण्यासाठी बोलविले. सहज भेट म्हणून हे गृहस्त संगमनेरला गेले असता या महिलेने त्यांना तालुक्यातील एका हॉटेलमध्ये बोलविले. त्यावेळी हे गृहस्त गेले असता तेथे दोन महिला दारु पीत बसल्या होत्या. त्यांनी विचारले तुमचा ब्रँण्ड कोणता? मात्र, हा व्यक्ती माळकरी असल्यामुळे, त्यांना हा प्रकार काही पटला नाही. ते तत्काळ तेथून चालते झाले.
दरम्यान, ते अकोल्याकडे निघाले असता संबंधित महिलेचा फोन आला. ती म्हणाली की, आमचे अकराशे रूपये बील झाले आहे. आमच्याकडे फक्त पाचशे रुपये आहेत. त्यामुळे, तुम्ही सहाशे रुपये द्या. त्यानंतर यांनी थांबून सहाशे रुपये त्यांच्या हातात दिले आणि ते चालते झाले. मात्र, यावेळी मुख्य महिला म्हणाली की, साहेब.! माझे महत्वाचे बोलणे राहून गेले. आता हॉटेलवर नका तर झोळे येथे माझ्या या मैत्रीणीचा फ्लॅट आहे. तेथे आपण जाऊ आणि महत्वाची चर्चा करू. त्यांनी या व्यक्तीला फारच विनंती केल्यानंतर ते झोळे येथील फ्लॅटवर गेले. तेथे गेल्यानंतर जरावेळ गप्पा मारुन झाल्या आणि हि महिला म्हणाली की, माझ्या मैत्रीणीला तुम्ही खूप आवडता. त्यामुळे तिची शारिरीक भूक भागवा. मात्र, यावेळी या गृहस्थाने नकार दिला असता या महिलांनी त्यांना ब्लॅकमेलींग करण्यास सुरूवात केली.
तुम्ही जर माझ्या मैत्रीणीशी आम्ही सांगू तसे केले नाही. तर आम्ही येथेच आरडाओरड करू आणि लोकांना सांगू की, तुम्ही आमच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही संभोग केला नाही तर लगेच पोलिसांना बोलावून तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करु. त्यामुळे, अखेर हतबल होऊन या व्यक्तीकडून नको ते कृत्य करून घेतले. हा प्रकार घडल्यानंतर ते त्यांच्या घरी निघून आले. मात्र, मागे भलताच पराक्रम घडला होता. या ब्लॅकमेलीग करणार्या महिलांनी या गृहस्थाचा एक अक्षेपहार्य व्हिडिओ काढला होता. रात्रीपासूनच या महिलांनी त्यांना ब्लॅकमेलीग करण्यास सुरूवात केली. दोन लाख रुपये द्यावे लागतील. अन्यथा हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करु. या प्रकारामुळे, हा व्यक्ती पुरता घाबरुन गेला. एकीकडे आत्महत्या करावी की, पैसे देत रहावे हा सर्व संभ्रम निर्माण झाला.
दरम्यान, हतबल झालेला हा व्यक्ती प्रचंड तणावाखाली आला होता. त्यामुळे, त्याने स्वत:ला बंदीस्त करून घेतले. मात्र, ही महिला त्यांना शोधत शोधत त्यांच्या घरी आली. हा राडा अधिक वाढत चालल्याचे लक्षात येताच त्यांनी संगमनेर गाठले. यावेळी, संबंधित महिलेने त्यांचा मोबाईल काढून घेत त्यांना शिवीगाळ दमदाटी करीत मारहाण केली. तर दोन लाख रुपयांची मागणी करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यावेळी, या महिलेने धिटाई करुन त्यांच्याकडून दोन वेगवेगळ्या एटीएममधून 30 हजार रुपये काढून दिले. हे पैसे घेताना देखील व्हिडिओ काढण्यात आला. उर्वरित रक्कम दिल्यानंतर पुरावे डिलीट करू असे सांगण्यात आले. त्यामुळे, या हनी ट्रॅममध्ये बरेचसे पुरावे पीडित व्यक्तीकडे आहे. ही रक्कम घेतल्यानंतर संबंधित महिलेने त्या व्यक्तीस पुढील वायदा केला होता. त्यामुळे, तो प्रचंड तणावात होता.
आता त्याच्यापुढे दोनच पर्याय उरले होते. एकतर आत्महत्या करणे किंवा सर्व घडलेला प्रकार पोलिसांपुढे कथन करणे. तेव्हा हा सर्व प्रकार अकोले पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांना सांगितला असता त्यांनी प्रथमत: पीडित पुरुषास फार धिर दिला. आत्महत्या हा अंतीम पर्याय नाही. त्यामुळे, जर तुम्ही धैर्याने पुढे आलात तर येणार्या अनेक तरुणांचे आयुष्य बराबाद होण्यापासून वाचेल. तसेच, अनेक पुरुषांचे उध्वस्त होणारे जीवण तुमच्यामुळे वाचेल. कारण, या महिला फार प्रोफेशनल असल्याचे त्यांना सांगितले. थोडा त्रास होईल पण, अनेकांचे उध्वस्त होणारे संसार तुमच्यामुळे वाचतील. त्यामुळे, पीडित व्यक्तीने फार मोठे पाऊल उचलुन घुगे यांना साद दिली. पुढे जे काही होईल त्यासाठी पोलिसांनी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर यात वर्दीचा हस्तक्षेप झाला.
पैशाची चटक लागलेल्या या महिलेने मंगळवार दि. 13 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास फोन केला. की, जर आज दुपारी मला पैसे दिले नाही तर मी व्हिडिओ व्हायरल करेल असे म्हणत ब्लॅकमेलींग केले. त्यानंतर पीडित व्यक्तीने याबाबत पोलीस अधिकारी घुगे यांना माहिती दिली. घुगे यांनी त्यांची एक टिम साध्या वेशात सुगाव फाटा येथे तैनात गेली आणि मंगळवारी दुपारी 3 वाजता या महिलेला तेथे बोलविण्यात आले. दरम्यान ब्लॅकमेलींग करुन 10 हजार रुपयांची खंडणी वसुल केल्याप्रकरणी पंचांसह तिला ताब्यात घेण्यात आले. तर तिच्यासोबत असणारे रावसाहेब पंढरीनाथ सटाले (रा. संगमनेर) याच्यासह 6 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या हनीट्रॅप प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, पोलीस उपाधिक्षक राहुल मदने, सहा.पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांचेसह पीएसआय दत्तात्रय साबळे, बाबासाहेब बडे, विठ्ठल शरमाळे, आत्माराम पवार, आरती पानसरे, संगिता आहेर, संदिप भोसले, आनंद मैड आदी पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, अशा हनीट्रॅप प्रकरणात शक्यतो पुरूष लोक पुढे येत नाही. त्यामुळे, सामजविघातक महिलांचे फावले जाते. उगच इज्जतीचा पंचनामा व्हायला नको. त्यामुळे झाकली मुठ सव्वा लाखाची. असे म्हणत अनेक प्रतिष्ठीत लोक ब्लॅकमेलींगच्या आहारी जातात. पैसे देणे पसंत मात्र, पोलीस आणि तारीख पे तारीख नको.! मात्र, या व्यक्तीने स्वत:चा विचार न करता त्या महिलांच्या जाळ्यात अडकणार्या प्रत्येक व्यक्तीचा विचार केला आहे. त्यामुळे, असे जर आणखी कोणाला महिला ब्लॅकमेलींग करत असेल किंवा केले असेल तर त्यांनी अकोले किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा. संबंधित व्यक्तीचे नाव गोपनिय ठेवले जाईल. असे आवाहन मिथुन घुगे यांनी केले आहे. यात तक्रारदार याने मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अन्य व्यक्तींना अभिनंदन केले आहे.