ब्रेकींग.! लफडेबजीतून पतीने केली पत्नीची हत्या, समजून सांगूनही एकले नाही, दगडाने ठेचून दरीत फेकले.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी गावातील एका 45 वर्षीय महिलेचा अनैतिक संबंधावरून पतीला राग आला. त्याने घरापासून काही अंतरावर असणाऱ्या डोंगरभागात नेऊन पत्नीचा दोरीने गळा आवळून दगडाने ठेचुन निघृणहत्या केली. ही सर्व धक्कादायक घटना 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान घडली. यात मनीषा रामनाथ चाचण (वय 45, रा. खंडेरायवाडी, ता. संगमनेर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. जेव्हा खोलदरीत महिला मयत अवस्थेत आढळुन आली तेव्हा घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ पंचनामा केला. पोलीस निरीक्षक संदिप वऱ्हाडे यांनी तपास पथके तयार करून तपासला वेग दिला. घारगाव पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. काही संशयीत हालचाली पतीच्या आढळुन आल्या. जेव्हा पती रामनाथ भावका चाचण (रा. खंडेरायवाडी, ता. संगमनेर) यांना खाकी दाखवली असता ते पोपटासारखे बोलु लागले. त्यांनी खुनाची कबुली दिल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चोवीस तासांच्या आत गुन्ह्याची उकल केल्याने घारगाव पोलिसांचे कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, खंडेरायवाडी येथे चाचण कुटुंब गेली अनेक वर्षांपासून वास्तव्य करत आहे. प्रसिद्ध आचारी म्हणुन रामनाथ चाचण यांची पंचकृषीत ओळख आहे. पत्नी मनीषा चाचण देखील आपले घरचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. दोन्ही मुले बाहेर गावी नोकरी कामी असल्याने घरात दोघेजणचं राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी मयत मनीषा चाचण यांचे गावा शेजारी असणाऱ्या व्यक्तीसोबत प्रेम संबंध जुळले. त्यांचे एकमेकांसोबत जीव जडल्याने समज देऊन देखील त्यांना कुठलाही फरक पडला नाही. यावरून पती रामनाथ चाचण व पत्नी मनीषा चाचण या दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. वाद इतके टोकाला जात होते की, दोघांमध्ये मारहाण देखील होतं. त्यामुळे, पती रामनाथ चाचण हा नेहमी शिवीगाळ करून पत्नीला दमदाटी करत असे.
दरम्यान, वारंवार सांगुन देखील पत्नीत कुठली सुधारणा होत नसल्याने पती रामनाथ चाचण याला राग अनावर झाला. तो गावात जाऊन दारू पिला आणि पत्नीचा काटा काढायचा असे ठरवले. तो 18 नोव्हेंबर रोजी दुपारी पत्नी जनावरे चरण्यासाठी गेली असे दाखवुन तिचा दोरीने गळा आवळुन दगडाने ठेचुन हत्या केली. तिला खोल दरीत फेकुन दिले. ही सर्व घटना घडल्यानंतर आपल्यावर कोणाचा संशय येणार नाही म्हणुन तो पुन्हा दारू पिऊन साकुर परिसरातील एका हॉटेल मध्ये मासे खाण्यासाठी गेला. तेथे सीसीटीव्ही कॅमेरात बसला. जसे काही घडलेच नाही असे भासून तो पुन्हा घरी आला. पत्नीचा शोध घेऊ लागला. नातेवाईकांना फोन करून पत्नी मनीषा चाचण यांच्याविषयी विचारपूस करू लागला. आणि स्वतः फिर्यादी होत घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दरम्यान, आरोपी पती रामनाथ चाचण याने एक प्लॅन रचला. तो शोध घेण्यासाठी जाणाऱ्या नातेवाईक लोकांना दरीकडे जाऊ देत नव्हता. तेथे बिबट्या असतात तिकडे जाऊ नका असे सांगत असे. हा संशय आपल्यावर येऊ नये यासाठी त्याने एक युक्ती लावली. एका बाबाकडे मी गेलो त्याने सांगितले की, जनावरे चारत असताना ती एका खोल दरीत पडली तेथे जाऊन शोध घेऊ असे नातेवाईकांना सांगून तो दरीकडे नातेवाईकांना पाठवतो. तेथे पत्नी मनीषा चाचण ही मृत अवस्थेत भेटून येते. मात्र, तिच्या मानेवर दोरीची निशाण व तोंडावर जखमा असल्याचे दिसुन येत होते. पोस्टमार्टेम मध्ये देखील खुण असल्याचे समोर येते. त्यामुळे, तो पोलिसांपुढे बनाव करून तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत होता.
त्यानंतर पोलीस निरीक्षक संदिप वऱ्हाडे यांनी गुन्ह्यातील तपासला वेग दिला. त्यांनी फॉरेन्सिक टीमच्या सहाय्याने भौतिक पुरावे गोळा करून तपासाची दिशा ठरवली. काही संशयितांना ताब्यात घेतले. त्यावेळी पती रामनाथ चाचण याच्यावर संशय निर्माण झाला. त्याच्या चेहऱ्यावर कुठला ही हावभाव नसल्याने पोलिसांनी त्याला हेरले. मात्र, आरोपी रामनाथ चाचण याने देखील पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला खाक्या दाखवला असता तो पोपटासारखा बोलु लागला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला रात्री उशीरा खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. ही दमदार कामगिरी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले, पोलीस ना. दत्ता चौधरी,पो. कॉ. सुभाष बोडखे, प्रमोद गाडेकर, महादेव हांडे, भुतांबरे यांनी केली.
